Home »Maharashtra »Vidarva »Akola» Blind Anis Become International Cricket Player

बुलडाणा: रेल्वेत कटलरी विकणारा दृष्टिहीन अनिस झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 11:19 AM IST

बुलडाणा-गरीब परिस्थितीशी दोन हात करत केवळ जिद्द, चिकाटी परिश्रमाच्या जोरावर रेल्वेमध्ये कटलरीचे साहित्य विकणारा देऊळघाट येथील फलंदाज अनिस बेग हा आंतरराष्ट्रीय दृष्टिहीन क्रिकेटपटू बनला आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या दृष्टिहीनांच्या ‘टी-२० वर्ल्ड कप’मध्ये पाकिस्तानला हरवून विश्वविजेत्या संघात अनिसचा सहभाग होता.

अनिस फखरुल्लाह बेग मूळ देऊळघाट येथील आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेला अनिस जन्मजात दृष्टिहीन आहे. लहानपणापासूनच त्याला क्रिकेट खेळण्याचा छंद होता. प्राथमिक शिक्षण नाशिक माध्यमिकपर्यंतच शिक्षण त्याने मुंबईत घेतले. वडील वाहनचालक असल्यामुळे तो काही वर्षांपूर्वीच नाशिक येथे स्थायिक झाला आहे. क्रिकेट खेळण्याचे वेड असल्याने सर्वसामान्य मुलांमध्येच तो खेळायचा दृष्टिबाधितांच्या क्रिकेटला जास्त महत्व नसल्याने सुरवातीच्या काळात अनिसकडे दुर्लक्ष होत गेले. परंतु कुठल्याही परिस्थितीत हार मानता आणि उदरनिर्वाहाचे ठोस साधन नसल्यामुळे अनिसने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कटलरीच साहित्य विकून क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला. उशिरा का होईना मुंबईच्या एका संस्थेने त्याची निवड केली. दमदार फलंदाजीच्या जोरावर अनिसने भारतीय संघात प्रवेश मिळवला.

महाराष्ट्राचाएकमेव क्रिकेटपटू
फेब्रुवारीमहिन्यात पार पडलेल्या “विश्वचषक टि-२०’ स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्रातील तो एकमेव खेळाडू होता. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, न्युझीलंड, श्रीलंका, नेपाळ,बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दहा संघ खेळले. १२ फेब्रुवारीला बंगळुरू येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला हरवून भारत जगज्जेता ठरला. या विजेत्या संघाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्कार केला. आई- वडील, पत्नी आणि चिमुकल्या मुलीची जबाबदारी अनिसवर आहे.

भारतीय संघातअसणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक केरळच्या खेळाडूंचा त्या त्या राज्यात लाखो रुपयाचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तेथील शासनाने खेळाडूंना शासकीय नोकरीसुद्धा दिली. परंतु अद्यापही महाराष्ट्र शासनाने माझी दखल घेतली नाही. शासनाकडून मला नोकरीची अपेक्षा आहे. -अनिस बेग, आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेटपटू

Next Article

Recommended