आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचाराच्‍या नावाखाली ‘रासलीला’ करण्‍या-या बाबाचा भांडाफोड; महिलेने दिली तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव (बुलडाणा) – एका भोंदू बाबाने त्‍याच्‍याकडे उपचारासाठी आलेल्‍या महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्‍या तक्रारच्‍या आधारे त्‍याच्‍यावर खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्‍यात आज (मंगळवार) गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. त्‍यामुळे भोळ्या भाबड्या भाविकांना जादूटोणा यांची भीती दाखवून हा बाबा ‘रासलीला’ करत असल्‍याच्‍या बाबीला पुष्‍टी मिळाली आहे. ताठे महाराज असे त्‍याचे नाव आहे.
माक्‍ता–कोक्‍ता येथे हा बाबा अघोरी उपचार करतो. या ठिकाणी रोज ग्रामीण भागातील भाविक आपल्‍या समस्‍या घेऊन येतात. पारखेड येथील एका 38 वर्षीय महिलेची कंबर दुखत असल्‍याने 4 जुलैला या बाबाकडे उपचारासाठी आली. मात्र, उपचार करण्‍याऐवजी बाबाने तिचा विनभंग केला. महिलेने याला विरोध करताच झालेला प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्‍याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्‍यात दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे पोलिसांनी या भोंदू बाबावर गुन्‍हा दाखल केला आहे.