आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली पुस्तके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सरसावले आहेत. दर महिन्याच्या 5 तारखेला विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाेबतच विविध ठिकाणच्या अभ्यासिकांना भेट देऊन गरजेप्रमाणे पुस्तके भेट देण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे.
बोरगावमंजू येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राने गरजू मुलांच्या सोयीकरिता मोफत अभ्यासिका मे १९९३ रोजी सुरू केली आहे. या अभ्यासिकेत बोरगावमंजू परिसरातील असंख्य विद्यार्थी अभ्यासाला येतात. अभ्यासिकेला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे सीईओ एम. देवेंदर सिंह, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, तहसीलदार वैशाली वाहुरवाघ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना दिशा दिली आहे. भेटीदरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवंेंदर सिंह यांनी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले होते. २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अभ्यासिकेच्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्यासाेबत संवाद साधला. प्रत्येकाला पुस्तकाची भेट दिली. या वेळी संचालक देवानंद मोहोड, प्रा. संजय तायडे, संतोष चक्रनारायण आदी उपस्थित होते.

मी कायम तुमच्या सोबत असेल
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचीसुद्धा भेट घेतली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. मी तुमच्या पाठीशी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मनाची एकाग्रता कायम ठेवा
^स्पर्धा परीक्षा म्हटली की, यश-अपयश आलेच. यश मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवा. तुम्हीसुद्धा एक दिवस आयएएस अधिकारी बनाल, हा विश्वास कायम ठेवा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवंेंदर सिंह यांनी या वेळी केले.'' एम.देवेंदर सिंह