आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरगावातील तलाठी बेपत्ता, शेतकरी झाले त्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू; ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालय असून, भाग १, २, ३, साठी तलाठी, एक मंडळ अधिकारी आहेत. तीन ते चार महिन्यांपासून तलाठी हे ११ ते या कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना मंडळ अधिकारी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. या आठवड्यात सोमवारी मंडळ अधिकारी कार्यालय बंद होते, तर डिसेंबरला बोरगावमंजूचा आठवडी बाजार असल्यामुळे परिसरातील शेतकरी फेरफारसाठी, तर विद्यार्थी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आले होते. मात्र, कार्यालयील वेळेत तलाठी कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शेतकरी विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शेतकरी विद्यार्थ्यांना तसेच परतावे लागले. डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी ग्रामविकास अधिकारी यांची बैठक होती. मात्र, याबाबतची माहिती सूचना फलकावर लावण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांना नाहकचा त्रास सहन करावा लागला. बोरगावात मंडळ अधिकारी कार्यालय असल्यामुळे तलाठ्यांनी सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. मात्र, तलाठी मंगळवार शुक्रवार या दोन दिवसच कार्यालयात हजर असतात. विचारणा केली असता तहसीलला काम आहे, असे सांगितले जाते. संजय गांधी निराधार कार्यालयाच्या आदेशवरून निराधार तसेच श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना अर्ज हा तलाठ्यांकडे जमा करावा लागतो. मात्र, कार्यालयात तलाठीच हजर राहत नसल्यामुळे अर्ज कोणाकडे द्यावा, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे
मीफेरफारसाठीतलाठी कार्यालयात दोन दिवसांपासून चकरा मारत आहे. मात्र, कार्यालयात तलाठी हजर नव्हते. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. प्रल्हाद होळकर, शेतकरीबोरगावमंजू
नोटीस लावण्याच्या तलाठ्यांना दिल्या सूचना

तलाठ्यांनीसोमवारते शनिवार कार्यालयीन वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. बाहेरगावी गेल्यास, बैठक असल्यास तशा प्रकारची नोटीस लावावी. याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सुनील देशमुख, मंडळअधिकारी, बोरगावमंजू
बातम्या आणखी आहेत...