आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Borgaonmanju Bus Stop On Darkness, Security Risk

बसस्थानकात अंधाराचे साम्राज्य; चिडीमारांमुळे सुरक्षा धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू येथील बसस्थानक. - Divya Marathi
बोरगावमंजू येथील बसस्थानक.
बोरगावमंजू; येथीलबसस्थानकावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, यामुळे चिडीमारीला उधाण आले आहे. तसेच रात्री बसस्थानकावर लाइट बंद असतात. अंधारामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे, तर विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अकोला जिल्ह्यातील सर्वात जास्त उत्पन्न देणारे बोरगावमंजू बसस्थानक आहे. मात्र, प्रवाशांसाठी बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही. शौचालय मुत्रीघरांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एसटी महामंडळ प्रवाशांकडून भाडेस्वरूपात मुबलक पैसा घेत आहे.
मात्र, महामंडळ प्रवाशांना सुविधा देण्यात असमर्थ आहे. महामंडळाकडून प्रवाशांची गैरसोय केली जात आहे. रात्री बसस्थानकावर अंधार पसरलेला असल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंधाराचा फायदा चिडीमार घेताना दिसून येत आहेत. रात्रीच्या वेळी बसस्थानकावर देशी दारू पिणाऱ्यांची तसेच चोरट्यांची संख्या जास्त असते. बोरगावमंजू येथून दररोज हजारो प्रवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी ये-जा करतात. असुविधांकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची प्रवाशांमध्ये चर्चा आहे.

एसटी महामंडळ प्रवासी वाढवा अभियान राबवते. वाहक-चालक मात्र अभियानाची एेशीतैशी करताना दिसून येत आहेत. वाहक-चालक प्रवाशांना बसमधून मधेच उतरवून देतात. असे प्रकार अनेक दिवसांपासून घडत आहेत. सायंकाळी सहानंतर बहुतांश बसेस बाहेरच प्रवाशांना उतरवून देतात. बसस्थानकावरील अंधार पाहून सरळ निघून जातात. बोरगाव ते अकोला दरम्यान प्रवास करणारे ३८४ पासधारक आहेत. त्रैमासिक मासिक पासधारक १६ आहेत. दीड महिन्यापूर्वी कार्यरत असलेले वाहतूक नियंत्रक पागृत यांनी समस्यांबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करून प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या हाेत्या. नव्याने आलेले वाहतूक नियंत्रक जुमळे यांनी पाणी, लाइट समस्यांबाबत वरिष्ठांना कळवले आहे.

दोन-तीन दिवसांत लाइट सुरू
बसस्थानकातील लाइट बंदबाबत सप्टेंबरला वरिष्ठांना कळवले आहे. २२ सप्टेंबरला लाइट दुरुस्तीसाठी कर्मचारी आले. मात्र, लाइटची दुरुस्ती झाली नाही. दोन-तीन दिवसांत लाइट सुरू होतील. एस.टी. जुमळे, वाहतूक नियंत्रक, बोरगावमंजू.

महिलांसाठी सुविधा देणे गरजेचे
महिलांसाठीबसस्थानकावर कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. शौचालयामध्येसुद्धा सर्वत्र घाण असते. अंधारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे. आरतीआगरकर, प्रवासी, बोरगावमंजू.

एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी द्यावे लक्ष
बोरगावमंजूयेथील बसस्थानकावर रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे बसेस बाहेरच थांबतात. त्यामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांना धावत जावे लागते. बस पकडण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाइट सुरू असल्यास बस बसस्थानकात येतील. त्यामुळे बसस्थानकातील या समस्येकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. डॉ.भरतकुमार अजमेरा, पासधारक, प्रवासी
विद्यार्थ्यांना थांबावे लागते अंधारातच
मीगत पाच वर्षांपासून एसटीने प्रवास करतो. मात्र, अकोला येथून शाळा सुटल्यानंतर सायंकाळी राधाकृष्ण टॉकीजजवळ एसटी थांबत नाही. बोरगावला थांबा नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना अंधारात थांबावे लागते. यशवाडेवाले, पासधारक विद्यार्थी.
महिला प्रवाशांची होतेय कुचंबणा