आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: जर्मनीची ‘बॉश’ देणार मुलींच्या आयटीआयमध्ये रोजगार प्रशिक्षण ​

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला येथील मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था. - Divya Marathi
अकोला येथील मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
अकोला- अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सेवा पुरवणारी जर्मनी देशामधील ‘बॉश’ ही जागतिक कंपनी आहे. या कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार पहिल्या बॅचला सुरुवात होत आहे. त्यासाठी २५ उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला मुलींच्या आयटीआयमध्ये सुरुवात झाली आहे. प्रशिक्षणासाठी मुलींच्या आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. 
 
बॉश ही अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञान, सेवा पुरवणारी जागतिक कंपनी 
जर्मनी मधील बॉश ही अभियांत्रिकी सेवा पुरवणारी जागतिक कंपनी आह२८ डिसेंबर २०१५ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत राज्यातील २४ आयटीआय जर्मनीतील बॉश कंपनीसोबत विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारांतर्गत ‘ब्रिज’ ( BRIDGE) हा प्रशिक्षण कार्यक्रम सार्वजनिक- खासगी भागीदारीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

असा होईल फायदा 
रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्ये जसे संवाद कौशल्य, व्यक्तीमत्व विकास , ग्राहक सेवा, स्वयंशिस्त , मुलाखत कौशल्य, औद्योगिक विशेष ज्ञान, इंग्रजी संभाषण कौशल्य, संगणक इत्यादी माहितीचा प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या पहिल्या बँचला अडीच हजार रुपये किंमतीची लर्नर किट बॉश कंपनीकडून देण्यात येणार आहे. ब्रिज कोर्स प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण वेळ दोन महिने कालावधीचा आहे. त्यासाठीची निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी प्रथम प्रवेश घेणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाहेरील जिल्ह्यातील मुलींची राहण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे. 

प्रथम प्रवेशास प्राधान्य 
आठवी पास१८ ते २५ वयोगटातील रोजगार करू इच्छिणाऱ्या २५ महिला उमेदवारांना पहिल्या टप्प्यांमध्ये ‘ब्रिज’ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ’’
- प्राचार्यप्रमोद भंडारे 
बातम्या आणखी आहेत...