आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ वर्षांपूर्वीच्या हजार वाहनांना लागणार "ब्रेक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - १५ वर्षांहून अधिक जुन्या मालवाहू वाहनांवर लवकरच बंदी येणार आहे. अशा वाहनांची वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पानंतर होण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील पाच हजार मालवाहू वाहने बंद हाेतील. मात्र, याव्यतिरिक्त १५ वर्षांपेक्षा जुनी कार, दुचाकी, तीनचाकी वाहनांना पर्यावरण कराचे कवच मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयाचा फटका माल वाहतूक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. जिल्ह्यामध्ये पाच हजार मालवाहू वाहनांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. प्रत्यक्षात या वाहनांचे आयुर्मान ठरवण्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन केंद्र शासनामध्ये गत पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसतानाच केंद्राकडून हा निर्णय जाहीर झाल्याने मालवाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात लाखांच्या वर जुनी वाहने आहेत. अशा वाहनांचा पर्यावरण कर भरून वाहनांची तपासणी करून त्यांना पुन्हा पाच वर्षांसाठी परवानगी दिली जाते. यात वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम आहेत. जुनी वाहने स्क्रॅप करताना त्या वाहनाचे थकित कर माफ केले जातात. मात्र, नवीन वाहन घेताना करांमध्ये कोणतीही तरतूद नसल्यामुळे लोकं वाहने स्क्रॅप करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. स्क्रॅप झालेल्या गाड्यांना इन्सेंटिव्ह एक्साइजमध्ये सवलत देण्याची घोषणा जरी झाली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र नाही. प्रदूषण नियंत्रण अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी १० वर्षांहून जुन्या गाड्या मोडीत काढल्यास हजारांपासून ६० हजारांपर्यंतचा इन्सेंटिव्ह देण्याची योजना केंद्र सरकारने यापूर्वीच तयार केली आहे. मालकांनी गाड्या मोडीत काढल्याचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात येणार आहे. असे केल्यास त्यांना इन्सेंटिव्ह एक्साइजमध्ये सवलत देण्यात येईल.
जुन्यागाड्यांमुळे प्रदूषण : पंधरावर्षे जुन्या गाड्या अधिक धूर सोडतात म्हणजेच प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरतात. नव्या गाड्या फार त्रासदायक नसतात. त्यामुळे वाहनधारकांनी जुन्या गाड्यांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेतली पाहिजे.

धुरामुळे श्वासोच्छ्वासाला त्रास : रस्त्यावरूनधावणाऱ्या दुचाकी चारचाकी गाड्यांच्या धुरामुळे श्वासोच्छ्वास घेताना त्रास होतो. आबाल-वृद्धांना लागलीच धाप लागते. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

जुन्यावाहनांचा २०-३० किलोमीटरसाठी वापर : जिल्ह्यामध्येप्रामुख्याने २० ते ३० किलोमीटरच्या वाहतुकीसाठी जुन्या वाहनांचा वापर केला जातो. यात वाळू, औद्योगिक माल, भाजीपाला, डबर वाहतुकीसाठी मोठ्या शहरांच्या प्रदूषणाशी निगडित आहे. या निर्णयानुसार १५ वर्षे जुने जिल्ह्यातील दोन हजार ट्रक भंगारात निघू शकतात.

असे मिळते वाहनांना जीवदान
१५ वर्षे जुन्या झालेल्या वाहनांना पर्यावरण कर भरल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडून वर्षे जीवदान दिले जाते. जोपर्यंत वाहनधारक स्वत: वाहन भंगारात जमा करत नाही, तोपर्यंत कर भरून वाहनाला जीवदान देण्याची पद्धत राज्यात सध्या अस्तित्वात आहे.