आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्याने पाण्याचा अपव्यय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरालापाच दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. परंतु, शहराच्या विविध भागांत जलवाहिन्या फुटल्याने एकीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे, तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

महापालिका पाणीपुरवठा विभाग पाणीपुरवठ्याचे दिवस कमी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. परंतु, क्षतिग्रस्त झालेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सुरू आहेत. पूर्वी सहा दिवसांआड पाणीपुरवठा होता, त्यामुळे जलवाहिनी फुटल्यानंतर पाण्याचा अपव्यय कमी होत होता. आता मात्र, काही भागांत तीन दिवसांआड तर काही भागांत चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने जलवाहिनी फुटल्यानंतर पाण्याचा अपव्ययही वाढला आहे. फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणीपुरवठा झाल्यानंतर फुटलेल्या जलवाहिनीतूनच पुन्हा दूषित पाणी जलवाहिनीत जाते. परिणामी, ज्या दिवशी पाणीपुरवठा होतो, त्या दिवशी अनेक भागांत नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होतो. याबाबत विविध भागांतील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारीही केल्या आहेत. परंतु, या तक्रारींची दखल अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विभागाने जलवाहिनींची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.