आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प,मुख्य जलवाहिनी फुटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने तसेच शहरातील अंतर्गत जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प राहणार आहे. दरम्यान शुक्रवार रात्री पर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास शनिवार पासून पाणी पुरवठा पूर्वपदावर येऊ शकतो. अन्यथा रविवार पासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.
शहराला महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ९०० आणि ६०० मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी रात्री ६०० मिलिमिटर व्यासाची मुख्य जलवाहिनी खडकी गावाजवळ फुटली. जलवाहिनी फुटल्याची बाब लक्षात आल्या नंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. परंतु या दरम्यान लाखो लिटर पाणी वाहुन गेले. तर नेहरु पार्क चौकात जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी ५०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी पाच ते सहा महिन्यापासून लिकेज होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरु होता. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने दोन दिवसापूर्वीच जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. अद्याप हे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ९०० आणि ६०० मिलिमिटर व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा ठप्प आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. शुक्रवारी रात्री पर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास शनिवार पासून पाणी पुरवठा पूर्वपदावर येईल. मात्र जलवाहिनीचे काम शुक्रवार रात्री पर्यंत पूर्ण झाल्यास ऱविवार पासून पाणी पुरवठा पूर्व पदावर येऊ शकतो. यामुळे दोन दिवस नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. दरम्यान पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे पाणी पुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त करीत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...