आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हशी खरेदी प्रक्रियेची हाेणार चाैकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - केवळ कागदाेपत्री म्हशींची खरेदी झाल्याचे दाखवून दुधाळ जनावरे वाटप याेजनेंतर्गत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार कृषी पशु संवर्धन सभापती माधुरी विठ्ठलराव गावंडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रशासनाला जाग अाली. याबाबत सीईअाेंनी जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांना शुक्रवारी चाैकशीचा अादेश दिला. 
 
स्थानिक स्वराज्य संस्था दुधाळ जनावरांचे वितरणासाठी याेजना राबवते. मात्र, जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांची प्रशासनावर पकड नसल्याने एक तर काेट्यवधी रुपयांच्या याेजना रखडतात किंवा याेजनेत घाेळ हाेताे. याला कृषी पशु संवर्धन विभागही अपवाद नाही. गत अार्थिक वर्षात काेटी ७२ लाख रुपयांची (काेंबड्या वितरण ) याेजना राबवण्यातच अाली नाही. तसेच सन २०१४-१५ मध्ये तर २७ लाख रुपये पडून हाेते. दरम्यान, अाता पशु संवर्धन विभाग सभापतींनी सीईअाेंना दिलेल्या पत्राच्या निमित्ताने चर्चेत अाला. 

अशी अाहे याेजना : जिल्ह्यातविशेष घटक योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचे वितरण केले. लाभार्थींना म्हशींचे वाटप करण्यासाठी काेटी रुपये खर्च केले. ही याेजना सन २०१६-१७मध्ये राबवली. यासाठी ३१७ लाभार्थींची निवड केली. त्यापैकी २८० लाभार्थींना लाभ दिल्याचे समजते. मात्र, अाता हे सर्व कागदाेपत्री असल्याचे सभापतींचे म्हणणे हाेते. 

‘त्या’प्रकरणाच्या चाैकशीची मागणी : एकाचव्यक्तीची अनेक नावे शेळीगट दुधाळ जनावरांच्या यादीत असल्याचा प्रकार जानेवारीतही उजेडात अाला हाेता. याबाबत जि. प. सदस्य विलास इंगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली हाेती. या एकाच व्यक्तीची नावे शेळी वाटप गट दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात येत असल्याचे यादीवर नजर टाकल्यास दिसून येत असल्याचे इंगळे यांनी तक्रारीत नमूद केले हाेते. लाभार्थींची निवड ही रॅन्डमपद्धतीने केल्याने यात घाेळ झाला हाेता. याप्रकरणाचीही चाैकशीची मागणी हाेत अाहे. 

लाभार्थ्यांकडील म्हशी गेल्या कुठे ? 
दुधाळ जनावरे याेजना तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकाऱ्यांनी राबवली. मात्र, लाभार्थ्यांकडेच म्हशी नसल्याचे कृषी पशु संवर्धन समिती सभापती माधुरी गावंडे यांनी सीईअाेंना दिलेल्या पत्रात नमूद केले. म्हशी नसलेल्या ग्रामस्थांकडून म्हशी खरेदी केल्याचे दाखले घेतले अाहेत. त्यामुळे सखाेल चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी, असेही सभापतींनी पत्रात म्हटले. अाता चाैकशीत लाभार्थींकडील म्हशी गेल्या कुठे, हे उजेडात येणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...