आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समास अंतराचा फटका बिल्डर्संना बसणारच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नव्याडीसी रूलनुसार एफएसआय काही प्रमाणात वाढवून मिळणार आहे. परंतु, शहरातील सुरू असलेले बांधकाम पाहता, अनेकांनी समास अंतर सोडलेले नाही. डीसी रूलमध्ये केवळ एफएसआय वाढणार आहे. यात समास अंतराचा काहीही संबंध नसल्याने एफएसआयमध्ये वाढ होऊनही समास अंतराचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे.

२००८ पासून तसेच त्यापूर्वीही केवळ एक एफएसआय मंजूर होता. आता नव्या डीसी रूलनुसार एफएसआय १.३ होण्याची शक्यता असून, प्रीमियम भरून .४ एफएसआय आणखी वाढवून मिळेल तर टीडीआरचा फायदा घेतल्यास एफएसआय दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या डीसी रूलचा अनेकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. या अनुषंगानेच आयुक्त अजय लहाने यांनी सुरू असलेल्या बांधकामधारकांची बैठक घेऊन डीसी रूल मंजूर होईपर्यंत बांधकाम करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने कोट्यवधींची उलाढालही ठप्प झाली आहे. त्यामुळे नवीन डीसी रूल लागू होण्याची प्रतीक्षा बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य माणूसही करत आहे. ज्या बांधकामधारकांनी दोन्ही बाजूने समास अंतर नियमानुसार सोडले आहे, त्यांना डीसी रूलचा खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे.

तूर्तास राज्य शासनाने त्यांच्या वेबसाइटवर डीसी रूल प्रसिद्ध करून यावर आक्षेप सूचना मागितल्या आहेत. या आक्षेप सूचना प्राप्त झाल्यानंतर ज्या सूचनांचा समावेश करणे शक्य आहे, त्यांचा समावेश करून डीसी रूल लागू केले जातील.

रेडिरेकनरनुसार प्रीमियम : रेडिरेकनरभावाच्या ७५ टक्के रकमेने पैसे भरल्यास बांधकामधारकांना .४ एफएसआय वाढवून मिळेल. ज्या ज्या भागात जागेचे भाव आहेत, त्यानुसार पैसे भरावे लागतील, तर टीडीआर विकूनही बांधकामधारकांना एफएसआय वाढवून घेता येणार आहे.

समास अंतर हवे
^नवाडीसी रूल लागू झाल्यानंतर वाढवून मिळालेला एफएसआय, प्रीमियम टीडीआर अशा एकूण एफएसआयनुसार बांधकामांवर कारवाई केली जाईल. परंतु, समास अंतर सोडलेले नसल्यास त्यावर कारवाई करावीच लागेल.'' अजय लहाने, आयुक्त,महापालिका