आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा बाजार समिती होणार ऑनलाइन, लवकरच ई-मंडी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - पाचशेहजार रुपयांच्या नोटा बंदीमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार पुर्णत: ठप्प झाले होते. त्यामुळे शासनाचा बाजार समित्यामधील व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीकोनातून बाजार समितीने ई-मंडी सुरु करण्याचे प्रयत्न आहे. यामध्ये बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नोटा बंदीच्या निर्णयानंतर नोव्हेंबरपासून तर २० नोव्हेंबर पर्यंत राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. शासनाने बँकेतून केवळ २४ हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे व्यापारी शेतमालाची खरेदी करु शकले नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने ई-मंडी सुरु करण्याची भूमिका घेतली आहे. शासनाच्या या निर्णयामध्ये बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धनादेश देऊन ई-मंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी ऑनलाईन व्यवहार करुन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील अशी माहिती दिली.

तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बुलडाणा बाजार समिती ऑनलाईन करण्याचे प्रयत्न सुरु आहे. बुलडाणा बाजार समितीत दूरवरून शेतमाल येतो. शेतकऱ्यांना त्वरित त्यांच्या शेतमालाचे पैसे मिळावे अशी बाजार समितीची भूमिका असल्याचे सभापती बुधवत म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...