आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीचे अर्ज भरण्यात बुलडाणा अव्वल ठरणार, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - कर्जमाफीचे अर्ज भरण्यात जिल्हा अमरावती विभागात अव्वल आहे. यंत्रणांनी चांगले कार्य केल्यास जिल्हा राज्यातही अव्वल ठरेल, त्यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक कर्ज माफी देण्यात येणार आहे. याबाबतचे अर्ज ऑनलाइन भरण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेचे अर्ज जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भरावे, असे आवाहन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज माफी योजनेची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते पालकमंत्री बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि. प. सीईओ षण्मुख राजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सैनिकांच्या नावे थकीत पीक कर्ज असल्यास त्यांच्या कर्जमाफीचा अर्ज सैनिकांचे नातेवाईक भरू शकणार असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, शेतकरी मयत असल्यास त्यांच्या वारसदाराचे कर्ज माफ होणार आहे. 
 
अर्जासाठी १,०७२ बायोमेट्रिक मशीन 
जिल्ह्यात एकूण दोन लाख ६१ हजार ३६० शेतकरी थकबाकीदार असून, नियमित परतफेड करणारे शेतकरी एक लाख ६६ हजार ६७ आहेत. यापैकी एक लाख ५६७४० अर्ज प्राप्त झालेले आहे. ही आकडेवारी विभागात सर्वात जास्त आहे. जिल्ह्यात १,०७२ बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून १,८९२ केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाइन मोफत अर्ज भरण्यात येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...