आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१९६८ साली ६० दिवस बंद होता सराफा बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - केंद्रशासनाने लादलेल्या अबकारी कराविरोधात संपूर्ण देशभरात याचे तीव्र पडसाद उमटले असून, तब्बल १७ दिवसांपासून सराफा बाजार बंद आहे. अतिरिक्त अबकारी शुल्क रद्द करण्यासाठी मूक मोर्चा, कँडल मार्च, धरणे आंदोलन, काळ्या फिती लावून निषेध आदी विविध आंदोलने करण्यात येत आहेत. याच कराला विरोध म्हणून १७ मार्चला दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तथापि, या बंदमुळे जिल्ह्यातील सराफा बाजारातील ५० कोटींवर व्यवहार ठप्प झाले असून, नागरिकांची मात्र मोठी पंचाईत होत आहे.
दरम्यान, १९६८ साली गोल्ड कंट्रोल अॅक्टला विरोध दर्शवत सर्वाधिक ६० दिवस सराफा बाजार बंद होता. हा कायदा रद्द केला जावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जेलभरो आंदोलनदेखील करण्यात आले. दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरातील सराफा व्यावसायिकांचा लढा हा एक्साइज ड्यूटीच्या विरोधात असून, बजेट सादर झाले तेव्हापासून हा संप सुरू आहे. अबकारी शुल्काविरोधात सराफांनी सलग दुसऱ्यांदा बंदची हाक मारली आहे. २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना व्यावसायिकांनी तब्बल २२ दिवसांचा बंद पुकारला होता. आतापर्यंत देशपातळीवर तीनदा सर्वाधिक कालावधीसाठी सराफा बाजारात शुकशुकाट बघायला मिळाला. इतर वेळी सराफांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्थानिक स्तरावर बाजार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, हा बंद फार कालावधीसाठी नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

कपडाबाजारातही शुकशुकाट : सराफाबाजार केव्हा सुरू होईल, याच्या प्रतीक्षेत असलेल्या कपडा मार्केटमध्येही शुकशुकाट बघायला मिळत आहे. सराफा बाजार केव्हा सुरू होईल, यासाठी कपडा व्यावसायिक दररोज सराफांशी दूरध्वनीवरून पाठपुरावा घेत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. लग्नाला लागणारे सोने कपडे सहसा एकत्रितपणे खरेदी करण्यात येत असल्याने कपडा व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. सराफा बंद असल्याने केवळ कपडे खरेदी करण्यासाठी शहरात येण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनीही पाठ फिरवली आहे.
मोठीपंचाईत होत आहे.

दरम्यान, १९६८ साली गोल्ड कंट्रोल अॅक्टला विरोध दर्शवत सर्वाधिक ६० दिवस सराफा बाजार बंद होता. हा कायदा रद्द केला जावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जेलभरो आंदोलनदेखील करण्यात आले. दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरातील सराफा व्यावसायिकांचा लढा हा एक्साइज ड्यूटीच्या विरोधात असून, बजेट सादर झाले तेव्हापासून हा संप सुरू आहे. अबकारी शुल्काविरोधात सराफांनी सलग दुसऱ्यांदा बंदची हाक मारली आहे. २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना व्यावसायिकांनी तब्बल २२ दिवसांचा बंद पुकारला होता. आतापर्यंत देशपातळीवर तीनदा सर्वाधिक कालावधीसाठी सराफा बाजारात शुकशुकाट बघायला मिळाला. इतर वेळी सराफांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्थानिक स्तरावर बाजार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, हा बंद फार कालावधीसाठी नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

कपडा बाजारातही शुकशुकाट : सराफाबाजार केव्हा सुरू होईल, याच्या प्रतीक्षेत असलेल्या कपडा मार्केटमध्येही शुकशुकाट बघायला मिळत आहे. सराफा बाजार केव्हा सुरू होईल, यासाठी कपडा व्यावसायिक दररोज सराफांशी दूरध्वनीवरून पाठपुरावा घेत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. लग्नाला लागणारे सोने कपडे सहसा एकत्रितपणे खरेदी करण्यात येत असल्याने कपडा व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. सराफा बंद असल्याने केवळ कपडे खरेदी करण्यासाठी शहरात येण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनीही पाठ फिरवली आहे.

सरकारचे मोठे नुकसान
सराफाबंद असल्याने नागरिक कारागिरांची गैरसोय होत आहे. सरकारचेही मोठे नुकसान होत आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा'' {प्रकाश सराफ,व्यावसायिक.

कराला विरोध नाही
अतिरिक्त अबकारी शुल्कामुळे व्यवसाय करणे अशक्य होणार आहे. अबकारी शुल्काचे नियम जाचक असून, यामुळे व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल.'' {अमोल मुंडगावकर,व्यावसायिक

१९६८ साली सर्वाधिक ६० दिवसांवर संप
२०१२ मध्ये २२ दिवस होता सराफा बाजार बंद
२०१६ मध्ये सध्या १७ दिवसांचा संप

इतर वेळेस काही दिवसांसाठी होते बाजार बंद
१९६८ मध्ये झाले होते जेलभरो आंदोलन
सप्टेंबर १९६८ साली संसदेने गोल्ड कंट्रोल अॅक्ट पारित केला होता. सोने विक्री साठवणुकीवर वचक ठेवण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी कायदा केला. जून १९९० अर्थमंत्री मधू दंडवते यांनी तो रद्द केला. कायदा अस्तिवात आला तेव्हा जेलभरो आंदोलन झाल्याचे जुन्या व्यावसायिकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...