आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या वादावरून महिलेला पेटवले, सहा आरोपींना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महिलाबचत गटांच्या थकित हप्त्यावरून महिलांमध्ये वाद झाला. त्यातून एका महिलेच्या अंगावर इतर सदस्यांनी रॉकेल टाकून जाळले. त्यात ७० टक्के भाजल्यामुळे महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. ही घटना बाभुळगाव जहागीर येथे घडली. याप्रकरणी मृतक महिलेच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
रुकसाना बी लियाकत खॉ (वय ४०) रा. बाभुळगाव जहागीर असे मृतक महिलेचे नाव आहे. रुकसाना बी लियाकत खाँ यांचा एक महिला बचत गट आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुकसाना यांच्याकडे बचत गटाचा हप्ता थकित होता. तो मागण्यासाठी बचत गटातील इतर महिला गुरुवारी रात्री वाजताच्या सुमारास रुकसाना यांच्या घरी गेल्या. मात्र, आता आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे देऊ शकत नाही, असे रुकसाना यांनी त्यांच्या घरी आलेल्या युनूस खाँ चाँद खाँ, अनिसखाँ चाँदखाँ, शकीला बी चाँदखाँ, जैनुबी शेख युसूफ, निकाहत बी शेख मेहबूब, रुकसाना शफावत खाँ यांना सांगितले. मात्र, आताच्या आता पैसे पाहिजे, असे म्हणून या सर्वांनी तिच्यासोबत वाद घातला रुकसाना यांच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले. त्यात रुकसाना ही ७० टक्के भाजल्या गेली. तिला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या वेळी तहसीलदार यांनी रुकसाना यांचे बयाण नोंदवले. त्यात आपल्याला युनूस खाँ चाँॅद खाँॅ, अनिस खाँ चाँद खाँ, शकीला बी चाँद खाँ, जैनुबी शेख युसूफ, निकाहत बी शेख मेहबूब, रुकसाना शफावत खाँ यांनी बचत गटाच्या पैशावरून अंगावर रॉकेल टाकून जाळल्याचे बयाण दिले. यात गुरुवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, रुकसाना यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात भादंवि ३०२ हे कलम दाखल केले. सर्व आरोपींना शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मिश्रा करत आहेत.