आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीटाकळीत लागलेल्या आगीमध्ये कापूस, रुई, यंत्रसामग्री जळून खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शीटाकळी येथीलदानिया कॉटन इंडस्ट्रीज येथे रविवारी लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे जवान. - Divya Marathi
बार्शीटाकळी येथीलदानिया कॉटन इंडस्ट्रीज येथे रविवारी लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे जवान.
 बार्शी टाकळी- बार्शी टाकळीते महान बाह्यवळण मार्गावरील चौफुलीजवळ दानिया कॉटन इंडस्ट्रीज येथे रविवारी मे राेजी कापूस यांत्रिक संच सुरु असताना शॉट सर्किटमुळे फॅक्टरीतील कापूस, रुई आणि यंत्र सामग्रीने पेट घेतला. या वेळी कापसाने मोठा पेट घेतल्याने हजारो क्विंटल कापूस, रुई आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली. या घटनेमुळे फॅक्टरीतील अंदाजे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचे कॉटन फॅक्टरीचे मालक आतिकखान एजाजखान रा. अकोला यांनी सांगितले.जिल्ह्यातील सर्व भागात सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. दुसरीकडे यावर्षी शहरातील जिनिंग फॅक्टरीमध्ये कापसाची आवक वाढली आहे. बार्शीटाकळीवरुन महानकडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर असलेल्या दानिया कॉटन फॅक्टरीला रविवारी मे रोजी शॉटसर्कीटमुळे आग लागली. उन्हामुळे वातावरणात शुष्कता असल्याने आगीने रौद्र रुप धारण करुन कापूस, रुईच्या गंजीसह फॅक्टरीतील यंत्र सामग्रीने पेट घेतला.या आगीत फॅक्टरीतील सर्व यंत्रसामग्री जळून खाक झाली. या वेळी फॅक्टरीतील मजुरांनी अग्निरोधक यंत्राने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु रुईच्या गठाणात आग शिरल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयास केल्यानंतर आग आटोक्यात आणली. दानिया कॉटन फॅक्टरीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडी क्रं. एम. एच. ३० एच.५०५५ चे चालक प्रमोद इंगळे, फायर मन साहेबराव शिरसाट, कर्मचारी सलिम चौधरी, म. रिजवान यांनी प्रयत्न केले. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. जिनिंग फॅक्टरीला आग लागल्याचे कळताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. दरम्यान नागरिकांच्या सहकार्याने फॅक्टरीचे काही नुकसान टळले तरी ३० ते ३५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शहरात यावर्षी आग लागण्याची ही सहावी घटना आहे. दुसरीकडे नगरपंचायत प्रशासनाने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी सोयी, सुविधा उपलब्ध केल्याविषयी नागरिकांमध्ये चर्चा सुरु होती. 
 
बातम्या आणखी आहेत...