आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लांजूड फाट्यावर एसटीबस उलटली, चाळीस प्रवासी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- समोरूनयेणाऱ्या मारुती कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे सदर बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या अपघातात बसमधील चाळीस प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज, सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास खामगाव-नांदुरा मार्गावरील लांजूड फाट्याजवळ घडली.

खामगाव एसटी आगाराची एम.एच. ४०/ एन/ ९९४५ या क्रमांकाची बस धुळ्यावरून खामगावकडे येत होती, तर खामगाववरून एम.एच. १९/ एपी/ १४०८ या क्रमांकाची मारुती कार नांदुऱ्याकडे जात होती. लांजूड फाट्याजवळ येताच कारचालकाने समोर असलेल्या एका ट्रकला ओव्हरटेक केला. तेवढ्यात समोरून येत असलेल्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या बसने तीन पलट्या घेत बस रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघात घडताच बसमधील प्रवाशांनी एकच आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या अपघातात अनेक प्रवाशांच्या हात, पाय, कंबर डाेक्याला मार लागला आहे. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

बसचालक रामदास दळी, वाहक बी. एन. टिकार रा. शिरसगाव देशमुख, त्र्यंबक दुतोंडे (वय ७५) खामगाव, बाबराव राधोसिंग, डॉ. देविदास बानाईत (वय ७०) रा. चांदुरबिस्वा, गौतम हिवाळे (वय ३६), शांताबाई अलाट (वय ६५) रा. वरखेड, प्रल्हाद रायपुरे (वय ६०) रा. जिगाव, रत्नकला चव्हाण (वय ६०) रा. झोडगा, गुलाब रसुल शेख बिस्मिल्ला (वय ७२) रा. बाळापूर, पूजा उत्तम (वय २०) रा. आसलगाव, कल्याणी देशमुख (वय १७) रा. निमगाव, नांदुरा येथील वैभव कोलते (वय १८), यश पवार (वय १८), सरस्वती बाई सोळंके (वय ५०), सत्यभामा धोटे (वय ४५), लीला धोटे (वय ७०), रवींद्र इंगळे (वय ५२), गौरव देवकर (वय २०) तितल बोहरा (वय २०), पवन निर्मळ (वय १८), निमगाव येथील प्रगती मुळे (वय १८), निशा राठोड (वय २०), वडनेर येथील सागर वानखेडे (वय ३०), फरदापूर येथील रामभाऊ व्यवहारे (वय ३७), जिगाव येथील कमलाबाई वाघ (वय ५०), सत्यभामा रायपुरे (वय ६०), मलकापूर येथील हुसैन बेग गुलाम बेग (वय ६५), तरोडा येथील नर्मदा पवार (वय ५०), अकोला येथील सलमान खान बिस्मिल्ला खान (वय २५), वडी येथील रोहिणी इंगळे (वय २०), बैतुल येथील सुनीता मुळतकर (वय ४५), चांदुरबिस्वा येथील बाबुराव चव्हाण (वय ४०), गौतम हिवाळे (वय ३२) वडी येथील अनंता राऊत (वय २०) हे प्रवासी जखमी झाले.

अपघातस्थळी धाव
याअपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी रूपाली दरेकर, खामगाव एसटी आगारप्रमुख, कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर आमदार अाकाश फुंडकर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली.