आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचा रक्तदाब कमी झाल्याने बस उलटली रस्त्याच्या कडेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखरखेर्डा - बसचालकाचा रक्तदाब अचानक कमी झाल्याने, बस रस्त्याच्या खाली घसरून कलंडली. ही घटना आज ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास साखरखेर्डा -लव्हाळा मार्गावर घडली. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. खामगाव आगाराची खामगाव ते जालना जाणारी बस क्र. एम. एच. ४०- ५४७६ येथून किमी अंतरावर मोहाडी फाट्यानजीक आली असता, चालक शेषराव वाकोडे वय ५२ यांचा रक्तदाब अचानक कमी झाला.
त्यामुळे त्यांना भोवळ आल्याने बस अनियंत्रित झाली. तशाही अवस्थेत वाकोडे यांनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. या वेळी बस मध्ये असलेल्या ४२ प्रवाश्यांचा जीव कंठात आला होता. परंतु बस रस्त्याच्या कडेला जाऊन तिरपी होत कलंडली. यात बसमधून साखरखेर्डा येथे दवाखान्यात उपचारासाठी येत असलेली ६० वर्षीय वृद्ध महिला उषाबाई नाथाजी गवई यांच्या पायाला जबर मार लागला. अपघाताबाबत पोलिस तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूला माहित होताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

चालक शेषराव वाकोडे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येऊन सुटी देण्यात आली आहे. तर उषाबाई गवई यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या वाहक कैलास तायडे यांना अपघातासंबंधी विचारले असता नेमके काय झाले ते कळलेच नाही, असे सांगत चालकास चक्कर येत होती एवढे सांगितले. सायंकाळ पर्यंत बस काढण्याचे प्रयत्न सुरु होते.या भागामध्ये बस अपघाताचे प्रकार होत आहेत. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी बसचा आधार घेतात परंतु बसच्या अपघातामुळे त्यावरही विश्वास कुठवर ठेवावा, असे बोलले जात आहे. प्रवास सुरळीत होण्याची आवश्यकता आहे.
बातम्या आणखी आहेत...