आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सृष्टीवैभव संस्थेने हाती घेतला एक नवीन उपक्रम,फुलपाखरांचे प्रदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अलीकडे जैवविविधतेविषयी जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा घडत असून, त्याच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपल्या जैवविविधतेविषयी विद्यार्थ्यांनाच अल्प प्रमाणात माहिती आहे. विद्यार्थ्यांना त्यांची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी सृष्टीवैभव एका माहितीपटाच्या माध्यमातून जनजागरण करत असून, पुढील टप्प्यात फुलपाखरांची सचित्र माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
सृष्टीवैभव संस्थेने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जैवविविधतेची माहिती, त्याचे महत्त्व माहितीपटाच्या माध्यमातून पटवून देण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या शनिवारी शहरातील किंवा तालुका पातळीवरील शाळेत जाऊन हा उपक्रम राबवण्यात येतो. शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांना आपल्या देशातील जैवविविधता माहितीपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येते. विद्यार्थ्यांना भाषण, दीर्घ मार्गदर्शनाऐवजी चित्रपटाच्या माध्यमातून ही माहिती मिळत असल्याने लवकर उमजते त्यांच्या बालमनावर कोरली जाते, असे सृष्टीवैभव संस्थेचे उदय वझे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जगभरातील जैवविविधता, वन्यप्राणी, पशुपक्षी, कीटक, फुलपाखरे, तेलबिया, कडधान्य, वृक्षवेली आदींच्या माहितीसह जैवविविधता कायदा आदींची माहिती देण्याकरिता सव्वातासाचा माहितीपट तयार केला आहे. हा माहितीपट आजवर जिल्ह्यातील १६० शाळांमधून दाखवण्यात आला असून, आणखी १५० शाळांमधून दाखवण्याचे नियोजन आहे.

विद्यार्थी जाणणार दीड हजार फुलपाखरांची सचित्र माहिती
जैवविविधता जनजागृती उपक्रमांतर्गत आता भारतात आढळणाऱ्या हजार ५१६ प्रजातींच्या फुलपाखरांचे छायाचित्र प्रदर्शन साकारण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व प्रजातींच्या फुलपाखरांचे जीवनचक्र, संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...