आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबीज बियाण्यांच्या दरवाढीस तत्काळ स्थगिती; शेतकऱ्यांचे वाचणार 60 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शेतकरी शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) केलेल्या बियाण्यांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ स्थगिती दिली.

या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे सुमारे ६० कोटी रुपये वाचणार आहेत. दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर महाबीजने बियाण्यांच्या दरात वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मंत्रिमंडळ बैठकीत काही सदस्यांनी याबाबतच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवताना नाराजीही व्यक्त केली होती. नैसर्गिक वाढीचे सूत्र लक्षात घेत महाबीजने यावर्षी बियाणांच्या किंमती सरसकट १५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. परंतु, लंाबलेला पाऊस, गेल्या चार-पाच वर्षांपासून पडणारा दुष्काळ शेतकऱ्यांची िवशेषत: विदर्भातील सोयाबीन कापूस उत्पादकांची दयनीय स्थिती या पार्श्वभूमीवर शासनाने भाववाढीला स्थगिती दिली.

या स्थगितीमुळे सोयाबीन िबयाणांची ३० किलोची एक बॅग मागच्या वर्षीच्या िकंमतीतच शेतकऱ्यांना खरेदी करता येईल. यावर्षीच्या बॅगची िकंमत २०५० रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता किलोमागे १० ते १५ रुपये कमी िकंमतीत ही बॅग उपलब्ध होणार आहे. िवदर्भात सोयाबीनच्या ९३०५ जेएच ३३५ या दोन जातींना खूप मागणी असते. यावर्षी ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो या दराने या वाणांची िवक्री होणार होती. परंतु, भाववाढीला देण्यात आलेल्या स्थगितीमुळे स्वस्त दरात िबयाणे उपलब्ध होणार आहेत.

फरकाच्या रकमेचा मुद्दा अधांतरी
बियाणांच्या वाढीव दरांना स्थगिती दिल्यामुळे िनर्माण झालेल्या फरकाच्या रकमेचा मुद्दा अद्याप अनुत्तरीत आहे. दरम्यान, ही रक्कम शासनाच्या वतीने महाबीजला िदली जाईल की महाबीजलाच हा फटका सहन करावा लागेल, याचा उलगडा अद्याप झाला नाही. महाबीजचे मुंबईला जाणारे अधिकारी उद्या याबाबतही शासनाशी बोलणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...