आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज वितरण कंपनीचे साहित्य, तार चोरणारी टोळी गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - माना पोलिस ठाण्यांतर्गत इतर परिसरात वीज वितरण कंपनीची तार साहित्य चोरणारी टोळी उपविभागीय पोलिस अधिकारी नंदकुमार काळे यांच्या मार्गदर्शनात पकडण्यात आली. यामध्ये राजबहादूर अनिस चौधरी (वय ४६), अजमद खाँ बिस्मिल्ला खाँ (वय ३५), एजाज खाँ उर्फ राजा शेर खाँ (वय ३०), नुर मोहम्मद शेख मेहबूब (वय ३८), जमिरोद्दीन बाओद्दीन (वय ४०) सर्व रा. माना यांचा समावेश आहे. सर्वांनी आतापर्यंत ८.३ क्विंटल विद्युत वाहक तार, ३.५ किमी लांबीची अंदाजे किंमत तीन लाख रुपयांची तार, कंपनीचे प्लास्टिकचे वायर कव्हर २५० किलो अंदाजे किंमत ६० हजार रुपये, तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली लाख ५० हजारांची टाटा सुमो गाडी, ६० हजारांची दुचाकी असे एकूण लाख ५० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, एसडीपीओ नंदकुमार काळे यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या पथकाचे प्रमुख पीएसआय श्रीकृष्ण पाटील, कर्मचारी इरफान शेख, संदीप गुंजाळ, विजय मानकर, राधेश्याम पटेल, प्रकाश जुनगडे, मानाचे ठाणेदार अशोक वाघमारे, हेडकॉन्स्टेबल नरेंद्र पद््मने, भूषण नेमाडे, सुमेध मोहोड, सतीश कथे, संदीप पवार, विनोद तायडे, नीलेश इंगळे, राजेश वायधने, सचिन कुलट यांनी केली.

महावितरणचेही साटेलोटे : संबंधितप्रकरणात महावितरणच्या अधिकाऱ्यांचेही साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे. लाखोंची तार चोरी होत असताना या विभागाचे लक्ष कसे नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

गुन्ह्यात राजकीय पदाधिकारी : मूर्तिजापूरशहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी विद्युत तार चोरी प्रकरणात सापडला असून, त्याच्याकडून झालेल्या चौकशीत इतर ठिकणची तार चोरी प्रकरण उघडकीस आले.