आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ बाजारात विक्रीसाठी केली जाते उसाची लागवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार - जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. मात्र, तालुक्यामध्ये साखर कारखान्यांचा अभाव, तसेच सिंचनाच्या अत्यल्प सुविधा असल्याने येथील शेतकरी हे पीक केवळ बाजारात विक्री करण्यासाठी घेत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील मागील तीन वर्षातील ऊस लागवडीचा आढावा घेतला असता, तो अत्यल्प असल्याचे दिसून आले. शेतकरी हा ऊस कारखान्याला देण्यासाठी नाही, तर बाजारात विक्रीसाठी घेत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली. काही शेतकरी ऊस लागवडीची माहिती संबंधित विभागाला देत नसल्याने तालुक्यातील ऊस क्षेत्राच्या आकडेवारीबाबत अनिश्चितता आहे.

लोणार तालुक्यात एकही साखर सुरू नसल्याची स्थिती आहे, तर सिंचनाच्या सोयी अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा नगदी पिकांकडे आहे. त्यामुळे तालुक्यातील बोटावर मोजण्याएवढे शेतकरी जास्त उत्पादन देणारे असलेले उसाचे पीक घेत आहेत. सिंचनाच्या सोयीसुविधांचा अभाव आणि वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे. जे काही शेतकरी उसाची लागवड करत आहेत ते कारखान्याला देण्यासाठी नाही, तर बाजारात विक्री करण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे.

मकर संक्रातीनिमित्त ऊस बाजारात
तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेला काळ्या रंगाचा ऊस सध्या बाजारात विक्रीसाठी सज्ज झाला असून, मकर संक्रातीनिमित्त १५ ते २० रुपये प्रति नग याप्रमाणे हा ऊस बाजारात विकला जात आहे.

तीन वर्षात केवळ १२ हेक्टरवर ऊस
मजूरस्थलांतराचे प्रमाण तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे. दुष्काळाच्या झळा या तालुक्याला नेहमीच सहन कराव्या लागतात. अशातच २०१३-ते २०१५ या तीन वर्षात तालुक्यात एकूण १२ हेेक्टर क्षेत्रात उसाचे पीक घेण्यात आले. यामध्ये २०१३ मध्ये ०२ हेक्टर, २०१४ मध्ये ०२ हेक्टर आणि २०१५ मध्ये हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.

सन २०१५ मध्ये वाढला पेरा
२०१३ मध्ये चांगला पाऊस झाला होता त्यानंतरही त्यावर्षी केवळ दोनच हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. मात्र, २०१५ मध्ये अत्यल्प पाऊस झाला असूनही उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. ए.जे. तरटे, तालुका कृषी अधिकारी, लोणार.