आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनॉलची जागा मनपाकडे हस्तांतरित करा : महापाैर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुने शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कॅनॉल मार्गाच्या दुरुस्तीचे काम निधी उपलब्ध असताना केवळ जागा हस्तांतरणामुळे रखडले आहे. ही बाब लक्षात घेऊन ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन महापालिकेला हस्तांतरीत करावी, अशी मागणी एका पत्रातून महापौर उज्ज्वला देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. विशेष म्हणजे दिव्य मराठीने २० सप्टेंबरला १५ कोटी निधीतील तीन रस्त्याची कामे रखडली, या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते.
२०१३ मध्ये शासनाने शहरातील विविध रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला १५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातून जुने शहरातील डाबकी रोड आणि जुना बाळापूर रोड या दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या कॅनॉल रस्त्याचा समावेश होता. विशेष म्हणजे जुने शहरात या निधीतून केवळ हाच रस्ता घेण्यात आला. परंतु, अद्यापही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले नाही. ‘दिव्य मराठी’ने या समस्येकडे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत महापौर उज्ज्वला देशमुख यांनी २० सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. पूर्वी पाटबंधारे विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु, ते रद्द करण्यात आले. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याचे पत्रही संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे.

हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून, या भागातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी या मार्गाची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. परंतु, पाटबंधारे विभागाने सुधारित प्रमाणपत्र दिल्याने रस्त्याचे काम सुरू करता आलेले नाही. त्यामुळे आपण आपल्या अधिकाराचा वापर करून हा रस्ता मनपाकडे हस्तांतरीत करावा, अशी मागणी पत्रातून केली आहे. दरम्यान, जुने शहरातील महत्त्वाच्या असलेल्या कॅनॉल मार्गाच्या दुरुस्तीचे काम निधी उपलब्ध असताना केवळ जागा हस्तांतरणामुळे रखडले आहे.
बातम्या आणखी आहेत...