आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट येथे आगीत दोन वाहने जळाली, इमारतीच्या पार्किंगमध्ये रात्रीच्या वेळी घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - शहरातील गुजरातीपुरा भागातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत कार दुचाकी जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवार, मे रोजी रात्री वाजतादरम्यान घडली. गुजरातीपुरा येथील श्रीहरी हाइट्स ही तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री वाजतादरम्यान धूर निघत असल्याचे बाबाभाई सेजपाल यांना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी तिथे धाव घेतली. यादरम्यान पार्किंगमधील बबलू संगणे यांची कार आणि दुचाकीने पेट घेतला. नागरिकांनी घरांमधून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रुद्र रुप धारण केल्याने त्यांना अपयश आले. यादरम्यान अकोट तेल्हारा येथून अग्निशामक दलाची वाहने आल्यानंतर एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत कार दुचाकी जळून गेली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पार्किंगच्या बाजूला असलेल्या मुकेश सेजपाल यांच्या गारमेन्ट्सच्या दुकानाचे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पार्किंगमधील चार-पाच दुचाकी काढल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच सुदैवाने आगीत जीवित हानी झाली नाही.

रस्तापडला अरुंद : रस्ताअरुंद असल्याने घटनास्थळी अग्निशामक दलाचे वाहन पोहोचू शकले नाही. ते जयस्तंभ चौकात उभे करून तेथून पाइप ओढण्यात आला. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही

इमारतीत राहणारे नागरिक अडकले
श्रीहरी हाइट्समधील रहिवासी रात्री झोपेत असल्याने त्यांना आग लागल्याची कल्पना नव्हती. नागरिकांची आरडाओरड ऐकून त्यांना आगीची माहिती मिळाली. यादरम्यान आगीने उग्र रूप धारण केल्याने धुराचे लोट असल्याने जिन्यातून येण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे नागरिकांनी शिडी लावून त्यांना बाहेर काढले.

आग विझवण्यासाठी यांनी केले शर्थीचे प्रयत्न
आग विझवण्यासाठी मुबारक अली, गब्बर अली, मोबीन अली, समीर सावजी, सागर सातपुते, अरविंद जामोदकर, पवन जामोदकर, रामा बंगाली, किरण सेजपाल, सचिन सातपुते, मेहुल सेदाणी, महेश सातपुते, मितेश मणियार, हितेश चावडा, केशव भोरे, संजीव सातपुते, पप्पू सेजपाल आदींनी शर्थीचे प्रयत्न केले. पोलिस अधिकारी कर्मचारी, वीज कंपनीचे कर्मचारी, नगरसेवक रामचंद्र बरेलिया यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
बातम्या आणखी आहेत...