आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास नकार देणाऱ्या नवरदेवासह इतरावर गुन्हे, वधुच्‍या वडिलांनी 5 लाख रुपयेही दिले होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोणगाव - येथून जवळच असलेल्या विश्वी येथील युवतीचे वाशीम जिल्ह्यातील राजुरा अढाव येथील युवकाशी लग्न ठरले होते. काही दिवसापूर्वीच त्यांचा साखरपुडा सुध्दा झाला होता. तसेच युवतीच्या वडिलांनी लग्न खर्च म्हणून युवकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले. परंतु आता वर पक्षाने अचानक लग्नाला नकार दिला. त्यामुळे युवतीने डोणगाव पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी उपवर युवकासह इतरांवर गुन्हा दाखल केले आहेत.

 

विश्वी येथील युवतीचे राजुरा अढाव येथील जगदीश प्रकाश अढाव या युवकाशी लग्न ठरले होते. त्यानुसार विश्वी येथे १४ जून २०१७ रोजी साखरपुडा झाला. त्यावेळी लग्न खर्च म्हणून युवतीच्या वडीलांनी उपवर युवकाच्या वडिलांना पाच लाख रुपये देखील दिले. त्यानंतर मुलीकडील मंडळी लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी गेली असता मुलाकडील मंडळीने विविध कारणे सांगून लग्नास नकार दिला आणि शिविगाळ केली. त्यानंतर उपवर मुलाने युवतीसही लग्न होऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे युवतीने डिसेंबर रोजी डोणगाव पोलिसांत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी जगदीश प्रकाश अढाव, प्रकाश दिगंबर अढाव, वनिता प्रकाश अढाव यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...