आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसओएस’चा शंतनू नारखेडे ‘सीबीएसई’ बारावीमध्ये प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या शंतनू नारखेडेने ८९.२० टक्के गुण घेऊन सीबीएसईच्या बारावीच्या निकालात जल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज, रविवारी घोषित झाला. त्यानुसार शंतनूने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. शंतनू विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात त्यांच्या गुणपत्रिका बहाल केल्या जातील. 
 
अकोला जिल्ह्यात केवळ दोन संस्थांमध्ये सीबीएसईचे बारावीचे वर्ग घेतले जातात. त्यामध्ये शासनाचे नवोदय विद्यालय आणि स्व. राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था द्वारा संचालित एसओएस विद्यालयाचा समावेश आहे. एसओएसमध्ये केवळ विज्ञान शाखा आहे. तर नवोदयमध्ये विज्ञान शाखेसोबतच वाणिज्यचेही धडे दिले जातात. 

नवोदय विद्यालयातून सर्वाधिक ४६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये वाणिज्य शाखेचे १७ विद्यार्थी होते. या शाळेच्या एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १६ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च मानांकन असलेली ए-वन श्रेणी प्राप्त केली असून २१ विद्यार्थी ए-टू तर उर्वरित बी-वन श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याचवेळी एसओएसच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी ए-टू तर प्रत्येकी नऊ विद्यार्थ्यांनी बी-वन बी-टू श्रेणी प्राप्त केली. वाणिज्यशाखेत नवोदयच्या संकेत
जयेंद्रेचा डंका : वाणिज्यशाखेत नवोदय विद्यालयाच्या संकेत जयेंद्रेने निकालात बाजी मारली. त्याला ९१.४० टक्के गुण मिळाले. एसओएसमध्ये केवळ विज्ञान शाखा असल्याने नवोदयच्या १७ विद्यार्थ्यांनीच या शाखेतून ही परीक्षा दिली. दुसरे असे की या शाखेतील विद्यार्थ्यांना सेमी मायग्रेशनची मुभा असल्याने ते अकोल्यासह वाशीम, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आदी जिल्ह्यातील नवोदय विद्यालयातून शिक्षणासाठी येथे आले आहेत. त्यापैकी संकेत हा वाशिमचा रहिवासी आहे. 

शंतनूला डॉक्टर व्हायचेय 
अकोल्याच्या मलकापूर भागातील गुरुकुलनगरीमध्ये राहणाऱ्या शंतनूला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. त्याने यापूर्वीच ‘नीट’ची परीक्षा दिली असून, आजच्या निकालाच्या दिवशी तो हैद्राबाद येथे ‘एम्स’ची पूर्वपरीक्षा देण्यात व्यग्र होता. त्याची आई सविता नारखेडे यांनी त्याला निकालाची गोड बातमी कळवली. विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम आल्यामुळे त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याची धाकटी बहिणही एसओएसची विद्यार्थीनी असून, आई कुशल गृहिणी आहे. 
बातम्या आणखी आहेत...