आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हयातीच्या प्रमाणपत्रासाठी पेंशनधारकांना त्रास, कधी लिंक फेल तर कधी आधारकार्ड रिडच्या त्रुटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - ऑनलाइन पद्धतीचा मार्ग चांगला असला तरी तो अनेकदा डोकेदुखीचा ठरतो. याचा प्रत्यय जीवंत असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करणाऱ्या वृद्धांना आला आहे. सेवानिवृत्त पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जीवंत असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागते. डिसेंबर महिना सुरू असल्याने शहरातील अनेक पेन्शनधारक ऑनलाइन हयातीचे प्रमाापत्र सादर करण्यासाठी डिजीटल केंद्रावर जातात. पण कधी लिंक फेल हाेते तर कधी आधार कार्ड रिड होत नाही. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
जीवन प्रमाणपत्र योजनेतंर्गत पेन्शनधारकांची माहिती सुलभपणे उपलब्ध व्हावी यासाठी ऑनलाइन पद्धतीने हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी या प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे पेन्शन मिळण्यासाठी त्या पेन्शनधारकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. यामुळे पेन्शनधारकांच्या बायोमॅट्रीक प्रणालीसाठी आधार नंबरचा उपयोग केला जात आहे. या माध्यमातून डीजीटल हयातीचे प्रमाणपत्र बनवण्यात येते. सदर प्रमाणपत्र कोषमध्ये संग्रहीत केले जाते पेन्शन संवितरण प्रमाणपत्र ऑनलाईन मिळते. जीवन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पेन्शनधारकाला अधिकृत पेन्शन संवितरण एजन्सीमध्ये स्वत: हजर रहावे लागते किंवा ज्या कार्यालयात ते नोकरी करत होते. त्या कार्यालयाच्या अधिकारी कडून हयातीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. सदर प्रमाणपत्र संबंधित संवितरण एजन्सीकडे सुपुर्द करावे लागते.
पेन्शन धारकांना संवितरण एजन्सीमध्ये स्वत: उपस्थित राहून हयातीचे प्रमाणपत्र मिळविणे हे सर्वात मोठी समस्या आहे. वृद्ध शारीरिकदृष्ट्या आजाराने ग्रस्त असलेले नागरिक हयातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेस प्रमाणपत्र प्राधिकरणासमोर उपस्थित राहू शकत नाही. या शिवाय अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर आपल्या परिवारासोबत अन्य कारणामुळे आपले गांव सोडून बाहेर गावाला रहायला गेले आहे. त्यामुळे त्यांनाही पेन्शनप्राप्त करुन घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

ऑनलाइन हयातीचे प्रमाणपत्र मिळण्याचा प्रकार
पेन्शन धारकांसाठी एक बायोमॅट्रीक आधारीत डिजीटल सेवा केंद्र आहे. केंद्र, राज्य सरकार आणि अन्य सरकारी संस्थेच्या पेन्शनधारकांना या सेवेचा लाभ मिळतो. यासाठी संबंधित पेन्शनधारकाला संबंधित डिजीटल केंद्रावर जाऊन तेथे आधारकार्ड देऊन बायोमॅट्रीक म्हणजे हाताची बोटे अथवा डोळ्याच्या माध्यमातून आधारचा डाटा डाऊनलोड करावा लागतो. त्यानंतर पेन्शन संबंधित माहिती भरुन दिल्यानंतर हयातीचे प्रमाणपत्र मिळते.

बातम्या आणखी आहेत...