आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेस फंड निधी वाटपाचे हाेणार असमान वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषदेच्या सेसफंडाचे नियाेजन अंतिम टप्प्यात असून, निधी वाटपात असमान धाेरण अवलंबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली अाहे. सत्ताधारी सदस्यांना झुकते माप देण्यात येणार असून, यावरून सत्ताधारी विराेधकांमध्ये घमासान हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे.
यंदा गत तीन वर्षांच्या तुलनेने दमदार पाऊस झाला. परिणामी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येते. मात्र, या तरतुदीनुसार निधी खर्च होत नसल्याचे दिसून येत आहे. हा निधी खर्च होऊन रस्ते दुरुस्त व्हावेत, यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, अाता सेसफंडाच्या वाटपाचे बांधकाम विभागाकडून नियाेजन करण्यात येत अाहे. मात्र, निधी वाटपात सत्ताधाऱ्यांना झुकते माप कसे मिळेल, या दिशेने नियाेजन करण्यात येत असल्याचे समजते.

अंतर्गतवादाची शक्यता
जूनमहिन्यात पार पडलेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष सभापती निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप, काँग्रेसच्या रूपाने तयार झालेल्या महाआघाडीत विषय समिती सदस्य निवडीनंतर घमासान सुरू झाले. शिवसेनेच्या एका सदस्यावर एका समितीमधून माघार घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीच दबाव अाणला हाेता. याप्रसंगी सभागृहात शिवसेनेचा माेठा एकाही नेता उपस्थित नव्हता. भाजपचे हे दबावतंत्र यशस्वी झाल्याने भाजपच्या काही नेत्यांना निधी वाटपात झुकते माप देण्याचे अाश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले हाेते. अाता भाजपच्या निवडक नेत्यांना जादा निधी मिळल्यास ते सत्ताधाऱ्यांना काेंडीत पकडतील.

...तरसत्ताधाऱ्यांच्या मुळावर : जिल्हापरिषदेमध्ये सत्ताधारी भारिप-बमसंसमाेर महाआघाडीच्या रूपाने तगडा विराेधी पक्ष उभा राहिला अाहे. अाॅगस्ट महिन्यात समाजकल्याण समितीच्या सभेत दलित वस्ती सुधार याेजनेेंतर्गत घेतलेल्या ठरावावरून सध्या सत्ताधारी शिवसेनेमध्ये वाद सुरू अाहे. या याेजनेंर्तगत सन २०१५-१६ साठी एकूण २१ काेटी ९५ लाख ४४ हजार ५८० रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. अखर्चित राहिलेल्या तालुक्याचा निधी इतर तालुक्यांमध्ये वळता करण्याची मागणी शिवसेना सदस्य महादेवराव गवळे यांनी केली. यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे अावश्यक असल्याचे मत सभेचे सदस्य सचिवांनी व्यक्त केले हाेते. त्यानुसार पुढील सभेत यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. मात्र, नंतर अकाेला, बाळापूर तेल्हारा तालुक्यातील कामांसाठी निधी मंजूर करण्याचा ठराव घेतल्याचे इतिवृत्तामध्ये नमूद केले हाेते. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईअाे) अरुण विधळे यांच्याकडे धाव घेऊन कार्यवाहीची मागणी केली हाेती. त्यानुसार सीईअाेंनी कार्यवाहीला प्रारंभ केला. सेसफंडातील निधी वाटपात असमान नियाेजन झाल्यास सत्ताधारी शिवसेनेत घमासान हाेण्याची शक्यता अाहे.

सभेत मुद्या गाजणार : जिल्हापरिषदेची सर्वसाधारण सभा डिसेंबर राेजी हाेणार असून, विषय पत्रिकेवर केवळ १४ सप्टेंबरला झालेल्या सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्याच्या मुद्या नमूद केला अाहे. मात्र सेसफंडाच्या नियाेजनावरुन सत्ताधारी विराेधकांमध्ये खडाजंगी हाेण्याची शक्यता अाहे.

निधी खर्च करण्याचे अाव्हान
ग्रामीण भागातील रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या अखर्चित निधीचा मुद्दा जुलैच्या शेवटच्या अाठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत निकाली निघाला हाेता. मात्र, अाता पावसाळ्यात रस्त्यांची कशी देखभाल दुरुस्ती हाेणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत हाेता. सन २०१५-१६ मधील अखर्चित ४.९० काेटींचा निधी सन २०१६-१७ मध्ये खर्च करावा, अशी मागणी सभेत केली हाेती. त्यामुळे अाता तातडीने हा निधी खर्च करून रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी हाेत अाहे.

बातम्या आणखी आहेत...