आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनो सावधान! मंगळसूत्र चोरटे झालेय सक्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी वाजता मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेवरून महिलांनो सावधान, मंगळसूत्र चोरटे सक्रिय झाले आहेत, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

पोलिसांचा वचक कमी झाला की, चोरटे सक्रिय होतात चोरांचे उपद्रव मूल्य वाढते. याचा प्रत्यय गेल्या आठवडाभरापासून येत आहे. घरफोडीच्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोहिते प्लॉटमधील मधुप्रभा रेसिडेन्सीमध्ये ५१ वर्षीय देवयानी ज्ञानदेव बेलोकार राहतात. त्या भागवताच्या कार्यक्रमासाठी घरापासून काही अंतरावर गेल्या होत्या. भागवत संपल्यानंतर त्या घरी जात होत्या. या वेळी अचानक घनोकार यांच्या घरासमोरून विरुद्ध दिशेने दुचाकीवरून चोरटे आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेले. देवयानी बेलोकार यांनी आरडाओरड करण्यापूर्वीच चोरटे पसार झाले. त्यांनी या घटनेची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी खदान परिसरातील कोठारी वाटिका येथून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. त्यामुळे ही सलग दुसऱ्या दिवसाची दुसरी घटना आहे.

सिव्हिललाइन्समध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढले : सिव्हिललाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी, हाणामारीच्या घटना वाढल्या अाहेत. कृषिनगर, शिवणी येथे दरराेज काहीना काही घटना घडताहेत. चोरी झाली की नाकाबंदी करायची, असा फंडा पोलिसांनी चालवला आहे. नियमित नाकेबंदीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अप्रिय घटनांमध्ये वाढ होत आहे.
बातम्या आणखी आहेत...