आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे लक्ष, शुक्रवारी होणार सोडत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवार, १० जून रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण नेमके कोणत्या प्रवर्गासाठी निघणार याकडे आता राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे काही दिवसांपासून राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीनंतर अध्यक्षपदासाठी विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी केल्या जाणार आहे. यानंतर काहींना अपेक्षित अनपेक्षित विविध पदांचा लाभ मिळण्याचीही शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. यापूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, खुला प्रवर्ग अनुसूचित जाती हे आरक्षण निघाले होते. त्यामुळे शुक्रवारच्या या सोडतीत कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निघेल या उत्सुकतेसह राजकीय वर्तुळात विविधांगी चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते महिलांसाठी तर काहींच्या मते अनुसूचित जमातीसाठी हे आरक्षण निघेल अशी चर्चा होत आहे. या आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेतील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
अध्यक्षपदासाठी प्रसंगी चुरस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवार, १० जून रोजी दुपारी वाजता मुंबईच्या मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहावर सोडत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निघणारे आरक्षण कोणत्याही प्रवर्गासाठी निघाले तरीही निर्विवादपणे भारिप-बमसंची सत्ता राहील, अशी शक्यता आहे. आरक्षणामुळे राजकीय पक्षांतर्गतचे समीकरण मात्र बदलणार हे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...