आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत फेर बदलाचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेची झालेली हद्दवाढ, होणारी निवडणूक याच बरोबर जातीय समिकरणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याच्या हेतूने शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. या अनुषंगानेच मुंबईत मातोश्रीवर बैठक सुरू असून, अकोला येथूनही शिवसेनेचे पदाधिकारी या बैठकीला गेले आहेत. विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रमुखपदी जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन देशमुख तर महानगर प्रमुखपदी राजेश मिश्रा अतुल पवनीकर यांची वर्णी लागू शकते. या नियुक्तीची अधिकृत घोषणा एक ऑक्टोबरला होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नोव्हेंबर महिन्यात नगरपालिकेच्या तर फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर तसेच महापालिकेची झालेली हद्दवाढ जातीय समिकरणे लक्षात घेऊन शिवसेना नेतृत्वाने अकोल्यासह काही ठिकाणी जिल्हा प्रमुख महानगरप्रमुख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगानेच आज मुंबई येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या अकोला जिल्हा प्रमुखपदी जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख तर महानगर प्रमुखपदी राजेश मिश्रा अतुल पवनीकर या दोघांची वर्णी लागली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत शिवसेनेने अधिकृत घोषणा केली नसली तरी एक ऑक्टोबरला ही घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर हे जवळपास १४ ते १५ वर्षांपासून जिल्हा प्रमुख आहेत. यादरम्यान मधील एक ते दोन वर्ष संजय गावंडे यांनी जिल्हा प्रमुखपदाचे काम पाहिले होते, तर तरुण बगेरे हे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून महानगर प्रमुख म्हणून काम करत असून, या दरम्यान अतुल पवनीकर यांनीही काही काळ महानगर प्रमुख म्हणून काम पाहिले आहे, तर राजेश मिश्रा यांनी यापूर्वी निवासी उपजिल्हाप्रमुखपदी काम पाहिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याच्या हेतूने शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

दोन महानगराध्यक्षपद ?
मनपाची हद्दवाढ झाल्याने अकोला शहराला दोन महानगराध्यक्ष देण्याची चर्चा सुरू आहे. एकाकडे पूर्व तर दुसऱ्याकडे पश्चिम क्षेत्राची जबाबदारी दिली जाणार आहे. अद्याप महानगराध्यक्षपद एकच ठेवायचे की दोन ? याबाबत निर्णय झालेला नाही. जर एकच महानगराध्यक्षपद ठेवण्याचा निर्णय झाल्यास अतुल पवनीकर अथवा राजेश मिश्रा यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते.
बातम्या आणखी आहेत...