आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरा नणंदविरुद्ध गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरा नणंदविरुद्ध तेल्हारा पोलिसात १५ मार्च रोजी गुन्हा दाखल केला. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील विवाहिता शीतल सागर कोगदे ही सध्या तेल्हारा येथे अंबादास शिवराम नागे, साईनगर येथे माहेरी वास्तव्यास आहे. तिला तिचा पती सागर शंकरराव कोगदे, वय २० वर्षे, सासू इंदिरा शंकरराव कोगदे, वय ४८ वर्षे, सासरा शंकरराव दयाराम कोगदे, वय ५१ वर्ष, नणंद श्वेता शंकरराव कोगदे, वय २८ वर्ष यांनी शारीरिक, मानसिक छळ करून मारहाण केली. तसेच एक लाख रुपयांची मागणी केली, अशी तक्रार पीडित विवाहिता शीतल काेगदे हिने मंगळवारी रात्री १०.२२ वाजताच्या सुमारास तेल्हारा पोलिसात दिली.
पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला. आरोपी फ्लॅट क्रमांक ५, भाग्यश्री चेंबर, वैद्य कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील रहिवासी आहेत. तेल्हारा पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल गणपत गवळी पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...