आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्म्याच्या सात स्वगुणांनी जीवनाची बॅटरी चार्ज करा, ब्रम्हाकुमारी उषा दिदी यांचा हितोपदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हितोपदेश करताना राजयोगिनी ब्रम्हाकुमारी उषा दिदी. - Divya Marathi
हितोपदेश करताना राजयोगिनी ब्रम्हाकुमारी उषा दिदी.
अकोला - जसापाण्याचा गुणधर्म थंड आणि अग्नीचा गुणधर्म गरम असतो. अगदी तसाच आपल्या शरीरातील आत्म्याचा देखील गुणधर्म आहे. जीवन हे शरीर आत्मा यांच्याशी संबंधित आहे. ज्ञान, पवित्रता, प्रेम, शांती, सुख, आनंद, शक्ती हे सात गुणधर्म आत्म्याचे आहे. आपल्या शरीरातील आत्माच्या या सात स्वगुणांनी जीवनाची बॅटरी चार्ज करावी, असा हितोपदेश माऊंट आबू येथील राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषादीदी यांनी केले. श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवार, ११ डिसेंबर रोजी ‘जीवन का आधार - गीता का सार’ या कार्यक्रमात त्यांनी सायंकाळच्या सत्रात जीवन यज्ञाची माहिती विशद केली. गीतेचा आजच्या काळाशी संबंध स्पष्ट केला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अकोल्याच्या वतीने श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात माऊंट आबू येथील राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषादीदी यांच्या ‘जीवन का आधार - गीता का सार’ या अाध्यात्मिक अॅनिमेटेड प्रवचनाला शनिवार पासून प्रारंभ झाला. रविवारी सायंकाळच्या सत्रात उषा दिदी यांनी ‘गीता में वर्णीत सांख्य योग - आत्मज्ञान और स्थितप्रज्ञ’ या विषयी विवेचन केले. आपले शरीर एक एका वस्त्रासारखे आहे. जसे आपण रोज कपडे बदलतो तसे आत्मा शरीर बदलत असते. शरीर हे नश्वर आहे तर आत्मा अविनाशी आहे. जीवनात चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी आधी आपले कर्म चांगले असले पाहिजे. फळाची आशा करता कर्म करावे, असे गीतेत सांगितलेले आहे. वास्तविक फळ हे कर्माची सावली आहे. त्यामुळे कर्म जसे असतील फळ तसेच मिळेल. आयुष्यात जर प्रत्येक वेळी अपयश मिळत असेल तर आपण आयुष्याला दोष देऊ लागतो. पण आपल्याला आपल्यातील सात गुणधर्म माहित नसल्याने समाजात सकारात्मक कार्य घडत नाही.

प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्माचे सात स्वगुण आहेत. ज्ञान, पवित्रता, प्रेम, शांती, सुख, आनंद, शांती हे सातही गुण प्रत्येक व्यक्तीच्या आत आहे. गरज आहे ती त्यांना ओळखून बाहेर काढण्याची. म्हणजेच तसे कर्म करण्याची. हे सात गुण म्हणजे स्वधर्म आहे आणि हेच जीवनाचा आधार आहे. परधर्म म्हणजे सात अवगुणांनी जीवनात नुसते दु:ख प्राप्त होते. या सात गुणांनी जर आपण आपल्या आयुष्याची बॅटरी चार्ज केली तर आपण परिस्थिती, व्यक्तीची मनोवृत्ती आणि वायुमंडल बदलू शकतो.भगवत गीता ही मानवतेचे शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला शिकवते. यात जीवनाच्या संघर्षात विजयी होण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. आपण जे कर्म करत आहोत त्यामुळे आपण बंधनात अजून बांधल्या जात आहोत. आत्माचे जे सात गुणधर्म, स्वधर्म आहेत, त्यांच्या आधारे जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळी आपण कर्म बंधनातून सुटून जातो. तो खरा कर्मयोग आहे. आपल्या कर्म द्वारे जेव्हा दुसऱ्याला आनंद, सुख मिळतो त्यावेळी कर्म बंधन सुटू लागते. जीवनात यशस्वी होण्यासाठी, आनंद, शांतीच्या प्राप्तीसाठी आपल्यातील हे सात गुण ओळखून त्यांनी रोज सकाळी बॅटरी चार्ज करावे, असा सल्ला त्यांनी दिला. सकाळच्या सत्रात त्यांनी ‘सर्वशक्तीमान परमात्मा की शक्ती से सुखमय संसार’ याविषयी मार्गदर्शन केले. कालच्या सत्संगात दिदींनी कोणत्याही परिस्थितीत मनुष्याने डगमगून जाता आपल्यावरील दायित्वाचे निर्वहन करावे तसेच धर्माचे पालन श्रीमद भगवद गीता देते. एखाद्या नंदादीपासारखी मनुष्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देत असल्याचा हितोपदेश माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या राजयोगिनी उषादीदी यांनी केला. जीवनाचा आधार-गीता सार या विषयावर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या,जीवनातील कौटुंबिक समस्यांच्या निर्दालनासाठी गीता पथदर्शक आहे. ती कठीण परिस्थितीतून मार्ग दाखवते. तुम्हाला नव्या उमेदीने कठीण परिस्थितीशी दोन हात करायला लावते .म्हणून गीता उत्तम संस्काराची जणांनी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

जीवन रुपी यज्ञाचे शुद्धीकरण करा
आपलेजीवन हे एक प्रकारचे यज्ञ आहे. जसे होम द्वारे वातावरणाचे शुद्धीकरण केले जाते. तसेच तन मन धनाचे स्वाहाकाराने जीवन रुपी यज्ञात शुद्धीकरण करायचे आहे. यज्ञात तन म्हणजे वाईट कर्म, मन म्हणजे मनातील वाईट विचार आणि धन म्हणजे वाईट मार्ग याची शुद्धीकरण करायचे आहे. या तन मन धनाचे ज्ञान रुपी अग्नीत स्वाहाकार करून जीवन शुद्ध करावे. भगवंताची कृपा होण्यासाठी मनातील घाण साफ करणे आवश्यक आहे. जोपर्यंत मनात वाईट विचारांची घाण असेल तोपर्यंत भगवंताचा आशिर्वाद मिळू शकत नाही. जीवनरुपी यज्ञ शुद्ध कर्मानेच पूर्ण होतो. वेद हे ज्ञान असून त्याने कर्म शुद्ध होते. आणि ज्ञानाचे स्त्रोत हे केवळ अविनाशी परमात्मा आहे.

बातम्या आणखी आहेत...