आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री घेणार, रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा आढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान नऊ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. यात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा समावेश असून एकुण ११ प्रकल्पांचे काम रखडले आहे. या प्रकल्पांचे काम त्वरित मार्गी लागल्यास जिल्ह्यात ३२ हजार ७४९ हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे.
जिल्ह्यात एकुण १४ प्रकल्पांचे काम सुरु आहे. यापैकी एक प्रकल्प चालू आर्थिक वर्षात पूर्ण होणार असून उर्वरित २०१९-२०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ निश्चित केले आहे. परंतू गेल्या पाच ते सात वर्षापासून विविध प्रकल्पांची विशेषत: मध्यम प्रकल्पांची कामे सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह विविध कारणांनी रखडली आहेत. या रखडलेल्या कामांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच लाख ४३ हजार १०० हेक्टर असून शेतीलायक क्षेत्रफळ चार लाख ९६ हजार आहे. तर जुन २०१६ अखेर ६८ हजार ४५१ हेक्टर जमिन सिंचनाखाली आली आहे. एकीकडे सुधारीत प्रशासकीय मंजुरीमुळे कामे रखडली असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन
प्राधिकरणाने १३ ऑक्टोंबर २०१५ प्रसिद्ध केलेल्या एका पत्रानुसार मध्यम प्रकल्पांचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. प्राधिकरणाने म्हटले आहे की, कलम ११ (च) अन्वये प्रकल्पांची पूनर्स्थापना मंजुर होत नाही, तो पर्यंत कामे सुरु ठेवु नयेत. या पत्रामुळे समस्येत भर पडली आहे. मुख्यमंत्री हे पत्र रद्द करु शकतात. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या या आढावा बैठकीत या मुद्यावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात? याकडेही लक्ष लागले आहे.
सात टक्क्याने होणार वाढ
तुर्तास निर्माण झालेली सिंचन क्षमतेची शेतीलायक क्षेत्राचा विचार करता सिंचनाची टक्केवारी १३ आहे. या सर्व प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यात एक लाख हजार २०० हेक्टर जमिन सिंचनाखाली येईल. त्यामुळे सिंचनाची टक्केवारी २०.४० होईल. त्यामुळेच सिंचनाच्या टक्केवारीत सात टक्क्याने वाढ होणार आहे.
जिल्ह्याच्याविकासाचा आढावा : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, शुक्रवार, डिसेंबरला जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहे.
बातम्या आणखी आहेत...