आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लहान मुलींना चाइल्ड लाइनने मिळवून दिला न्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- दोन लहान मुलींना खायला देणे, घरात झोपू देणे, अमानवीय अत्याचार करणे यासह त्यांचे जगणे असह्य झालेल्या मुलींना चाईल्ड लाईनने न्याय मिळवून देत त्यांची रवानगी ममता शिशुगृहात करण्यात आली आहे.

नांदुरा तालुक्यातील टाकळी वतपाल येथील पंचफुला संजय वाकोडे या महिलेला सात अपत्ये असून त्या पाच मुलांसह माहेरी राहतात. तर तिच्या पतीने दुसरे लग्न केले. मोठे भाऊ लक्ष देत नाहीत. अाई खायला घालत नाही. घरात झोपू सुध्दा देत नाही. त्यामुळे काजल करिष्मा या सात वर्षाच्या दोन लहान मुली शाळेतील खिचडी खावून जीवन जगत हाेत्या. दरम्यान, या घटनेची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. या माहितीवरून त्यांनी ऑगष्ट रोजी चाईल्ड लाईनच्या संचालिका जिजाताई चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड लाईनच्या पथकाने मुलीच्या घरी भेट दिली. यावेळी जिल्हा समन्वयक किरण बिलोरे यांनी मुलीच्या आईशी चर्चा केली असता माझ्या पतीने दुसरे लग्न केले असून ते मला वागवत नाहीत. अशा परिस्थितीत सदर मुलींना कोणत्याही परिस्थितीत वागवत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सदर महिलेकडून तसे सरपंचासमक्ष लिहून घेण्यात आले. तर, मुलींना विचारले असता आईजवळ आम्हाला राहायचे नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. यावेळी परिविक्षा अधिकारी रुपेश वाकोडे यांनी सदर मुलींना तात्पुरते ममता शिशु गृह येथे ठेवण्याचे आदेश दिले. शिशुगृह अधिकारी डी.एन. मनवर यांनी मुलींना दाखल करून त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच रामप्रकाश पांडव, रविंद्र अहिरे, प्रसेनजीत इंगळे, अमोल पवार, शितल पवार स्वाती काळे यांनी सहकार्य केले. निराधार असलेल्या मुलींसाठी सामाजिक कार्यकर्ते धावून आलेत. त्यांचा खूप मोठा फायदा मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी होणार आहे. त्याशिवाय त्यांना जगण्याचे बळ मिळू शकणार नाही हेही खरे.
समस्याग्रस्त बालकांची माहिती त्वरित द्यावी
लहान बालकासंदर्भात कोणत्याही प्रकारची समस्या आढळून आल्यास त्यांनी चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकावर फोन करून त्वरित माहिती देण्यात यावी. समस्याग्रस्त बालकांची तत्काळ सुटका करण्यात येईल. किरणबिलोरे, जिल्हा समन्वयक.
बातम्या आणखी आहेत...