आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपींना अटक; २२ एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- चिमुकलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी पाेलिसांनी रविवारी अाराेपींना अटक केली. प्रवीण उर्फ पऱ्या प्रकाश चव्हाण (वय २३, रा. जंगम मठजवळ) गाेविंद परशुराम साखरे (वय ५३) ही अटक केलेल्या अाराेपींची नावे अाहेत. अाराेपींना दुपारी न्यायालयात हजार करण्यात अाले. न्यायालयाने अाराेपी प्रवीण चव्हाणची २२ एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली. दुसरा अाराेपी साखरेची न्यायालयाीन काेठडीत रवानगी करण्यात अाली. बलात्काराची संतापजनक घटना शनिवारी दुपारी टिळक राेडवरील एका वाणिज्य संकुलमध्ये घडली हाेती.
 
त्रिवेणेश्वर काॅम्पलेक्समधील चौथ्या मजल्यावरील एका बंद असलेल्या वास्तुमध्ये चिमुकलीवर नराधमांनी बलात्कार केला हाेता. अत्याचारानंतर चिमुकली रडतच खाली अाली. रडत असलेल्या या मुलीचा ड्रेस रक्ताने माखला हाेता. तिच्यासाेबत अनुचित प्रकार घडल्याचे काॅम्पलेक्समधील व्यापारी हमालांचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांना कळवले हाेते. रामदासपेठ पाेलिसांनी पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले हाेते. पाेलिसांनी रात्री अाराेपींवर गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, पाेलिसांनी चिमुकलीच्या कथन केलेल्या वर्णानावरून अाराेपींचा शाेध घेत दाेघांना ताब्यात घेतले. अाेळख पटल्यानंतर अाराेपींना अटक करण्यात अाली हाेती. 
बातम्या आणखी आहेत...