आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाेंबाऱ्याच्या खेळातून अल्पवयीन मुलीची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अल्पवयीनमुलीला डोंबाऱ्याचा खेळ करायला लावणाऱ्या पित्याच्या कचाट्यातून मुलीची सुटका करण्यात बालकल्याण समिती सदस्य अॅड. संगीता भाकरे यांना यश आले आहे. प्रकरण सिटी कोतवाली पोलिसात पोहोचले असून, पोलिसांनी हे कुटुंब निगराणीत ठेवले आहे. सोमवारी याप्रकरणी दुपारी वाजता बालगृहात सुनावणी ठेवली आहे.
भवतारा जि. बिलासपूर येथील रहिवासी रमेश नटराज हा आपल्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांमध्ये डोंबाऱ्याचा खेळ करतो. यासाठी तो पत्नी अनिता सहा वर्षांची मुलगी राधिका चार वर्षांचा मुलगा सनी याचा वापर करतो. त्यांनाही या खेळात सहभागी करून घेत रोजचे आठशे ते हजार रुपये कमवतो.

हे कुटुंब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खेळ करत असताना महिला बालकल्याण समितीच्या सदस्य अॅड. संगीता भाकरे यांना आढळून आले. त्यांनी ताबडतोब सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात फोन करून शहर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून त्या कुटुंबाला साहित्यासह ताब्यात घेतले.

त्या पित्याचे पोलिसांनी घेतले बयाण
अॅड.संगीता भाकरे यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी व्यक्तीचे बयाण नोंदवले. सोमवारी बालगृहात नटराज कुटुंबीयांची सुनावणी दुपारी वाजता होईल. तोपर्यंत कुटुंब पोलिस निगराणीत राहील.

मुलीला न्याय मिळवून देणार
^बालन्यायमुलांचे संरक्षण अधिनियम २००० नुसार भीक मागण्यासाठी मुलांना कामावर ठेवणे, त्यांच्याकडून पैसे कमवण्यासाठी वापर करणे हा गुन्हा समजला जातो. कलम २६ प्रमाणे मुलीचे वडील दोषी आहेत. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिच्या पाठीशी असू. अॅड. संगीता भाकरे, सदस्य,बालकल्याण समिती