आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॅलीला हिरवी झेंडी दाखवताना मान्यवर.)
अकोला- सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या श्री समर्थ शिक्षण क्रीडा प्रसारक मंडळ रणपिसेनगर, अकोला या सेवाभावी संस्थेंतर्गत चालवण्यात येणाऱ्या श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या माध्यमातून रॅलीद्वारे पर्यावरणाचा संदेश दिला.
संस्थाध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद््घाटन केले. यामध्ये जयश्री बाठे, किशोर कोरपे यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण, ग्लोबल वॉर्मिंग, या विषयांना धरून पर्यावरण रॅली काढण्यात आली. याद्वारे जनतेला संदेश देण्यात आला.
रॅलीमध्ये मुलांनी विविध प्राणी, फळे, फुले, तसेच पक्ष्यांची वेशभूषा करून रॅलीला सुशोभित केले. पर्यावरणाशी संबंधित घोषवाक्य म्हणत खेडकरनगर, हनुमाननगर, जठारपेठ, राऊतवाडी, बारा ज्योतिर्लिंग मंदिर रोड या परिसरातून मुख्याध्यापिका रिता घोरपडे यांच्या मार्गदर्शनात रॅली काढण्यात आली. यासाठी माधुरी सदाफळे, गुरनित ओबेरॉय, हर्षा ठाकरे, उमा पाटील, अंजना सोनोने, अश्विनी वडतकर, मीनाक्षी भारती, राधिका पांडे, सपना विरघट, शारदा जाधव, अर्चना कुकडे, स्मिता घुंगळ, सीमा पवार, तुषार नारे यांनी परिश्रम घेतले.
रॅलीला हिरवी झेंडी दाखवताना मान्यवर.