आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांची बचत आता बँकांसंगेही शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बँकेत खाते उघडता येत नाही म्हणून डब्यात किंवा पुस्तकात रक्कम जमा करणाऱ्या चिमुकल्यांनाही आता बँकांच्या बचत खातेदाराचा दर्जा बहाल केला जाणार आहे. एरवी अशी सोय उपलब्ध नव्हती. परंतु आता काही बँकांमध्ये ही सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शून्य ते दहा वर्षे वय असणाऱ्या लहानग्यांच्या नावे खाते उघडून त्या खात्याचा व्यवहार पालकांनी स्वत: करावा, अशी ही योजना आहे. हे खाते उघडण्यासाठी शुल्क आकारले जाणार नसून िमनीमम अकाऊंट बॅलेंसची अटही शिथील केली आहे. किमान ५०० रुपयांच्या ठेवीवर असे खाते उघडता येईल. अशा खातेधारकांना पासबुक एटीएम कार्डही नि:शुल्क दिले जाणार असून पहिल्या वर्षभरात त्यांच्याकडून कोणतेही मेन्टेनन्स चार्जेस घेतले जाणार नाही. मुलांमध्ये बचतीचा छंद जोपासला जाऊन नियमित रक्कम जमा करण्याची सवय लागावी, यासाठीचा हा प्रयोग आहे. बँकांच्या नियामक मंडळानुसार अशी खाती तीन गटांमध्ये विभागण्यात आली आहे. शून्य ते दहा वर्षे असा पहिला गट असून दहा ते सतरा वर्षे असा दुसरा गट आहे. या गटातील मुला-मुलींना स्वत:च स्वत:चे खाते हाताळता येईल. मात्र एकावेळी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मात्र काढता येणार नाही. त्यापेक्षा जास्त वयाचे उमेदवार तिसऱ्या गटात मोडत असून त्यांना आपल्या बचत खात्यात किमान अडीच हजार रुपये जमा ठेवणे आवश्यक केले आहे.

शाळांच्या संचयिकांची आठवण : पूर्वीशाळांमध्येच अशी खाती उघडली जायची. संचयिका अशी त्या खात्यांची नावं होती. मात्र त्यासाठीचे संपूर्ण व्यवहार एखाद्या शिक्षका मार्फत हाताळले जायचे. बँकांच्या पुढाकाराने आता त्याची प्रासंगिकताही संपुष्टात आली आहे.
पॉवर कीडस् बचत खाते
^लहान मुलांनाही खातेदार करुन घेणारी ‘पॉवर कीडस् अकाऊंट’ ही आयडीबीआय बँकेची योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी सर्वच शाखांमध्ये केली जाते. मुलांना बचतीचा मंत्र मिळावा यासाठी मुद्दामहून या योजनेला प्राधान्य देण्यात आले असून पालकांनी याचा लाभ घ्यावा.'' सचिन राऊत, सेल्स प्रमोटर.
बातम्या आणखी आहेत...