आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाईन फ्लूमुळे चिमुकल्यांचा मृत्यू, आरोग्‍य यंत्रणा हादरली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - संशयित स्वाईन फ्लूमुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना साेमवारी घडली. या मुलावर सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरु हाेते. याला अाराेग्य यंत्रणेकडून दुजाेरा दिला अाहे. तसेच याव्यतिरिक्त जुने शहरातील अाणखी एका चिमुकल्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे समजते. मात्र या वृत्ताला अाराेग्य यंत्रणेकडून दुजाेरा मिळू शकला नाही. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. 
 
गत काही दिवसांपासून वातावरणामुळे नागरिक अाजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून, रुग्णालयांनी रुग्णांची गर्दी वाढतच अाहे. अाकाेट फैल परिसरातील एका दाेन वर्षाच्या मुलाला शनिवारी सर्वाेपचार रुग्णालयात भरती करण्यात अाले. डाॅक्टरांना स्वाईन फ्लूचा संशय अाल्याने त्यांनी उपचारही सुरु केले. मात्र साेमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान दुसरी घटना जुने शहरात घडल्याचे समजते. एका आठ महिन्याचा मुलगा सुमारे दाेन अाठवठ्यांपासून अाजारी हाेता. अखेर रविवारी सायंकाळी एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने या चिमुकल्यावर झडप घातली. डॉक्टरांनी त्याच्या स्वॉबचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवले हाेते. त्याचा रिपोर्टही पॉझिटीव्ह अाला हाेता. त्यामुळे त्याच्यावर स्वाइन फ्लूचे उपचार सुरु करण्यात आले हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...