आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिकेची अवाजवी कर वाढ’; नागरिकांंनाे लिहिते व्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका प्रशासनाने शहरात केलेल्या अवाजवी कर वाढीचा फटका सर्व सामान्य जनतेला बसला आहे. अनेक आंदोलने, विरोधानंतर केवळ १० टक्के कर माफ झाली असली तरी देखील ही करवाढ अवाजवीच आहे. या विषयी आपला रोष, विचार मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. दैनिक दिव्य मराठी आणि भारीप बमसं मनपा गटनेत्या अॅड. धनश्री देव यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी विविध वयोगटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अकोला महापालिकेची अवाजवी कर वाढ’ या विषयावर लिहिते व्हा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
 
मागील १६ वर्षात कर वाढ करण्यात आली नाही. पण करवाढ करत असताना अकोल्यातील नागरीकांना महापालिकेने कोणत्या सुविधा दिल्या हा देखील प्रश्न आहे. अचानक केलेली कर वाढ याचा सर्वच नागरिकांना फटका बसला असून, नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिकांना त्यांचे विचार, रोष व्यक्त करता यावे या उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १८ वर्ष, १९ ते ३५ वर्ष आणि ३५ वर्षेच्या पुढे अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून, ‘अकोला महापालिकेची अवाजवी कर वाढ’ याविषयावर ६०० ते ८०० शब्दांमध्ये निबंध लिहावा. 

स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकाला २५०० रुपये रोख प्रमाणपत्र, द्वितीय २००० रुपये रोख प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाला १५०० रुपये रोख प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी नागरिकांनी त्यांचे निबंध सप्टेंबर पर्यंत दैनिक दिव्य मराठी, सहकार नगर, गोरक्षण रोड किंवा अॅड.धनश्री देव (अभ्यंकर), गटनेता भारीप बमसं मनपा, केला प्लॉट, जठारपेठ किंवा देव ट्रेडर्स, न्यु तापडीया नगर किंवा देवदत्त मोबाईल शॉपी, जवाहर नगर चौक किंवा लोकमान्य वॉच कंपनी, टिळक रोड किंवा यशवंत इलेक्ट्रीकल्स, युगंधर चौक, डाबकी रोड, जुने शहर येथे आणून द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...