आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बस वाहतुक सापडली वांध्यात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोलेकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली शहर वाहतुक बस सेवा परमिटमुळे काही अंशी वांध्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान दहा जानेवारीला आयुक्त आणि आरटीओ यांच्यात दुरध्वनीवरुन चर्चा झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसात हा प्रश्न निकाली निघून बस सेवेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 

आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित संस्थेकडून बस खरेदी करताना महापालिका कोणतीही गॅरंटी घेणार नसल्याची बाब स्पष्ट केली होती. यामुळे महापालिकेचा फायदा झाला. बस सेवेबाबत कंपनीशी करारनामा होऊन पाच बसेस शहरात दाखलही झाल्या. परंतु यापूर्वीच्या बससेवेत बसेस महापालिकेच्या नावाने होत्या. त्यामुळे आरटीओ कडून परमिट मिळताना अडचणी गेेल्या नाहीत. मात्र यावेळी बस खरेदीशी महापालिकेचा कोणताही संबंध नसल्याने बस थेटे संबंधित कंपनीच्या नावाने आहेत. त्यामुळेच एका कंपनीला बसचे परमिट कसे आणि कोणत्या नियमाच्या आधारे द्यावे? असा प्रश्न आरटीओ समोर उपस्थित झाला होता.
 
त्यामुळे बस सेवेची ट्रायल झाल्या नंतर केवळ परमिटसाठी बस सेवा अडचणीत आली होती. या अनुषंगाने आयुक्त आणि आरटीओ यांच्यात दहा जानेवारीला चर्चा झाली. 
आरटीओ अतुल आदे यांनी नागपूर आरटीओ यांच्याशी संपर्क साधुन माहिती घेतली तर आयुक्तांनी अहमदनगर सह विविध महापालिकेत अशा पद्धतीने बसेसला परमिट दिल्याची बाबही आरटीओंच्या लक्षात आणुन दिली. बस कपंनीच्या संचालकांनीही शासनाचे परिपत्रक आरटीओंना सादर केले. त्यामुळे परमिटचा गुंता दोन ते तीन दिवसात सुटण्याची शक्यता अाहे.