आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासाठी १०० काेटी रुपये देऊ, विकास अाराखड्याच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - विकास अाराखड्याच्या धर्तीवर प्रस्ताव सादर केल्यास शहरातील रस्त्यांसाठी १०० काेटी रुपये देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अकाेल्यात दिली. ते अतिविशेषाेपचार सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजनप्रसंगी बाेलत हाेते.
विधानसभा निवडणुकीत अकाेल्यात प्रचारासाठी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता अाल्यास शहराच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली हाेती. सध्या शहरातील चार मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण सुरू असले तरी काही ठिकाणी नवीन रस्ते अावश्यक अाहेत. ही बाब पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या लक्षात आणून देत अकोल्याच्या विकासासाठी निधीची मागणी केली. हाच धागा धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी रस्त्यांबाबत अकाेलेकारांना दिलासा दिला. मात्र, रस्त्यांच्या अाराखड्यामध्ये गल्लीतील रस्त्यांपेक्षा मुख्य रस्त्यांवर भर द्या. असेही ते म्हणाले. मनपाच्या हद्दवाढीमुळे शहरात २४ गावांचा समावेश अाहे. त्यामुळे महानगर विकासासाठी जास्त निधी देण्याची मागणी अामदार रणधीर सावरकर यांनी केली. निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

अाकृतिबंधासही मंजुरी : अकाेलायेथील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलच्या निमित्ताने अकाेला वैद्यकीय, रुग्णसेवेत एका विशिष्ट उंचीवर पाेहाेचले अाहे. हाॅस्पिटलसाठी केवळ इमारत, यंत्र सामग्रीसाठी निधी मंजूर केला नसून, हजार ७६ पदांचा अाकृतीबंधही मंजूर केला अाहे, असेही मुख्यमंत्र्यांंनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून, ही संख्या २० पर्यंत नेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डाॅ. राजेश कार्यकर्ते यांनी प्रास्ताविकात सांगितले. याकामांचे झाले लाेकार्पण : १००क्षमता असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहासाठी कोटी ७८ लाखांचे बांधकाम, ६० क्षमता असलेल्या मुलांच्या वसतिगृहाचे कोटी २१ लाखांचे बांधकाम, १०० क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे कोटी १५ लाखांचे बांधकाम, परीक्षा कक्ष प्रयोगशाळेचे कोटी ९३ लाखांचे बांधकाम ,केंद्रीय प्रयोगशाळा व्याख्यानालय सभागृह कोटी १४ लाखांचे बांधकाम ,मुख्य ओटी-२ चे कोटी ११ लाखांचे बांधकाम २१० खाटा असलेल्या वाॅर्डासाठी कोटी १३ लाखांचे बांधकाम अशा एकूण कामांसाठी शासनाकडून ३८ काेटी ४९ लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली अाहे. या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
१. अकोलामहानगरपालिकेच्या विकासाची वचनपूर्ती या पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते केले. दाेन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुस्तिकेचे प्रकाशन केले. मात्र, नेमका विकास कुठे झाला, हेच कळत नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली हाेती.

२.भूमिपूजनलाेकार्पण साेहळा केवळ शासकीय असल्याचे दिसून अाले. कार्यक्रमाला वैद्यकीय, परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थी-िवद्यार्थिनी, कर्मचारीच बहुसंख्येने उपस्थित हाेते. तज्ज्ञांच्या मते एकूण उपस्थिती हजारांपेक्षा जास्त नव्हती.

३.मुख्यमंत्रीअकाेल्यात दाखल झाल्यानंतरही मंडपातील बहुतांश खुर्च्या रिकाम्याच हाेत्या. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांनी लावलेल्या स्टाॅल्सवरील अनावश्यक कर्मचाऱ्यांना खुर्च्यांवर बसण्याचे अावाहन करण्यात येत हाेते.

४.कार्यक्रमसुरु हाेण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी व्यासपीठावरच ‘फाेटाेसेशन’ही केले.

असे राहिल हाॅस्पिटल
प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनंतर्गत फेज -३ अंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी १५० कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी १२० कोटी केंद्र तर ३० कोटी राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. हॉस्पिटलमध्ये कार्डीओलॉजी,कार्डीओ व्हॅस्क्युलर थोरॅसीक सर्जरी, न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी,प्लास्टिक सर्जरी बर्नस हे विभाग राहणार आहेत. हॉस्पिटलमध्ये १६० बेडची व्यवस्था राहणार आहे. या व्यतिरिक्त डायलिसिस युनिट १४ बेड, आय सीयु ४४ बेड, एनआयसीयु २० बेड, अति विशेषसेवेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इमारतीचे बांधकाम १२ हजार ६८० चौ.मी. असून, रुग्णालयालगतच्या ४.५ एकर जागेमध्ये या सुपरस्पेशालिटीचे निर्माण होणार आहे.
इमारतीसाठी ८२ काेटी ५४ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. अद्यावत यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी ६५ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...