आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Ready For Jijau Birth Anniversary Celebration

जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी मातृतीर्थनगरी झाली सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी जिजामाता जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. जिजाऊ माँ साहेबांची ४१८ वी जयंती आहे. त्या दृष्टीने रंगरंगोटी, सजावट, स्टॉल उभारण्याचे काम पूर्ण झाले असून. ११ जानेवारी रोजी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात सायंकाळी भव्य दीपोत्सव मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. जन्मोत्सवानिमित्त देशभरातून लाखो जिजाऊ भक्त येथे येत असतात.

जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून होते. त्या अनुषंगाने १२ जानेवारीपर्यंत दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतात. यंदा ४०० बुक स्टॉल १०० खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
आजसांस्कृतिक कार्यक्रम : ११जानेवारी रोजी रात्री जिजाऊ सृष्टी हॉल येथे जिजाऊ ब्रिगेडने राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १२ जानेवारी राेजी सकाळी वाजता जिजाऊ जन्मस्थळावर मराठा सेवा संघाच्या प्रमुख जोडप्यांसह जिजाऊ पूजनाने जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे, तर शासकीय कार्यक्रम १२ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ वाजता होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अल्काताई खंडारे यांच्या हस्ते जिजाऊ पूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार प्रतापराव जाधव राहतील. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद सदस्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टी येथे सकाळी वाजेपासून शिवधर्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहेत.दुपारी नंतर शिवधर्मपीठावरून मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.

सुप्रिया सुळे उद्या सिंदखेडराजात : सिंदखेडराजा राष्ट्रमाताजिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा स्त्री भ्रुणहत्या विरोधी आंदोलनाच्या प्रणेत्या खासदार सुप्रिया सुळे १२ जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी दिली. १२ जानेवारीला दुपारी वाजता खासदार सुळे यांचे सिंदखेडराजामध्ये आगमन होईल. त्या जिजाऊंचे जन्मस्थान, राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करतील. त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे राहतील. जिल्ह्यातील उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून दुपारी वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सिंदखेड राजा येथील राजवाड्यासमोर उपस्थित राहण्याचे अावाहन जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी केले.

४१८ मशालींची शोभायात्रा
सोमवार,११ जानेवारी रोजी मशाल यात्रा दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर, जिजाऊ जन्मस्थळावर राष्ट्रमाता जिजाऊंच्या ४१८ व्या जन्मोत्सवानिमित्त ४१८ मशाली घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मजोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांच्या नेतृत्वात मशाल यात्रा निघणार आहे. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदशाध्यक्षा डॉ. छायाताई महाले, प्रदेशाध्यक्ष शिवश्री वनिताताई अरबट, प्रदेश उपाध्यक्षा वनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात दीपोत्सव होईल.