आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विदर्भवादी-महाराष्ट्रवाद्यां’मध्ये रणकंदन; शिवसैनिकांचा राडा, विदर्भाचा झेंडा फाडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भवाद्यांच्या अांदाेलनात शिवसैनिकांनी अखंड महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घाेषणा दिल्या. - Divya Marathi
विदर्भवाद्यांच्या अांदाेलनात शिवसैनिकांनी अखंड महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घाेषणा दिल्या.
अकाेला - स्वतंत्र विदर्भ व अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून  १ मे राेजी विदर्भवादी व अखंड महाराष्ट्रवादी असलेले  शिवसैनिक मदनलाल धिंग्रा चाैकात अामने-सामने अाले. विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घाेषणाबाजी केली. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी अाक्रमक पवित्रा घेत स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फाडला.  
 
विदर्भवादी-शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. दाेन्ही बाजूने एकमेकांना इशारे देण्यात अाले. त्यानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची अातषबाजी केली. विदर्भवाद्यांच्या अांदाेलनात शिवसैनिकांनी राडा केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. 
 
विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीने साेमवारी धिंग्रा चाैकात जवाब दो आंदोलन केले. अांदाेलनाची कुणकुण लागताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन विराेध केला. विदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याला शेतकरी संघटनेच्या युवा अाघाडीचे प्रमुख अविनाश नाकट यांनी हार्रार्पण केले. शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांच्या अांदाेलनात राडा करत त्यांना मारहाण केली. पाेलिसांनी बळाचा वापर करत विदर्भवादी व शिवसैनिकांना तेथून हाकलून दिले. अांदाेलनात  शिवसेनेचे अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, निवासी उपजिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, संघटक तरुण बगेरे, मंगेश काळे, संजय शेळके, रवी सातपुते, गजानन चव्हाण, अश्विन नवले, अश्विन पांडे, राजेश इंगळे, अभिजित खडसाने, दिनेश सराेदे, बबलू उके, प्रशांत वानखडे, मनाेज बावीसकर, संताेष रणपिसे, मनाेज वाघ, संजय अग्रवाल, राहुल कराळे, देवा गावंडे, याेगेश बकाल, गाेटू अग्रवाल, मुकेश निमजे, केदार खरे, नंदकिशाेर चाकर, बालू चव्हाण, प्रमाेद मराठे, संजय भाकरे, सुरेश इंगळे, मुन्ना भाकरे, रुपेश ढाेरे अादी सहभागी झाले हाेते. 
 
अांदाेलन उधळण्याचा प्रयत्न  
विदर्भवाद्यांनी ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर स्वतंत्र विदर्भच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचे अांदाेलन शिवसैनिकांची उधळण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी असलेल्या लिंबू शरबतच्या दुकानांवरून लिंबू घेत ते विदर्भवादी व पुतळ्याच्या दिशेने फिरकावले. त्यामुळे विदर्भवादी अाक्रमक झाले. दाेन्ही बाजूने घाेषणायुद्धच रंगले. 
 
पाेलिस संरक्षणात काय अांदाेलन  करता?
शिवसैनिकांनी विदर्भसाठीच्या अांदाेलनात राडा केल्याने विदर्भवादी अाक्रमक झाले. त्यांनी शिवसैनिकांच्या घाेषणाबाजीला जाेरदार प्रत्युत्तर दिले. विदर्भवाद्यांची संख्या शिवसैनिकांच्या तुलनेने कमी हाेती. त्यामुळे पाेलिसांनी विदर्भवाद्यांना संरक्षण दिले. त्यांनी पाेलिस संरक्षणातच घाेषणाबाजी केली. त्यामुळे शिवसैनिकांनी ‘पाेलिस संरक्षणात घाेषणाबाजी, अांदाेलन काय करता; हिम्मत असले तर या रस्त्यावर, अशा शब्दात अाव्हान दिले. 
 
अन् शिवसैनिकांना पकडलेच...
विदर्भवाद्यांच्या अांदाेलनात शिवसैनिकांनी राडा केल्यानंतर काेतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे धिंग्रा चाैकात पाेहाेचले. त्यांनी प्रथम शिवसेनेच्या नेत्यांचा शाेध घेतला. काही नेते व कार्यकर्ते स्वराज्य भवनच्या दिशेने पळाले. अखेर पाेलिसांनी शिवसेनेच्या अकाेला पश्चिमचे प्रमुख तथा नगरसेवक राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, निवासी उपजिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, संघटक तरूण बगेरे, संजय शेळके यांना ताब्यात घेऊन पाेलिस ठाण्यात अाणले. 
 
शिवसेना नेत्यांची धाव
शिवसैनिकांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच अामदार गाेपीकिशन बाजाेरीया, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी सिटी काेतवली पाेलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांनी पाेलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर विदर्भवादी व शिवसैनिकांकडून तक्रार झाली नसल्याने पाेलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे प्रकरण मिटले. तत्पूर्वी पाेलिसांनी विदर्भवादी व शिवसैनिकांशी स्वतंत्ररित्या चर्चा केली. 
 
भाजप नेत्यांशी संपर्क 
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी साेमवारी जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी संपर्क साधला. वेगळा विदर्भ राज्य कधी देणार, याचा जाब विदर्भवाद्यांनी त्यांना विचारला. यावर भाजप नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला.
 
अांदाेलनापूर्वी घेतले हाेते ताब्यात 
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते अांदाेलन करणार अाहेत, याची माहिती सिव्हिल लाइन्स पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे सिव्हिल लाइन पाेलिसांनी विदर्भवाद्यांना दुपारी ताब्यात घेतले. मात्र काही वेळाने त्यांना साेडून देण्यात अाले. पाेलिसांच्या ताब्यातून सुटका हाेताच विदर्भवाद्यांनी अांदाेलन केले.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, 
- तुरीवरून परत पेटले अांदाेलन 
- विदर्भवाद्यांना नेले ऑटोतून ठाण्‍यात 
- विदर्भवादी आणि शिवसैनिक यांच्‍यात इशारे- प्रती इशारे अन् घोषणाबाजी
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...