आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृह अनुदान अडवणूक प्रकरण, दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वच्छभारत अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा टप्पा मिळताना अडचणी जाऊ नयेत, यासाठी दोन कर्मचाऱ्यांची स्पेशल नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे दिव्य मराठीने रविवारी 'स्वच्छतागृहाचे दुसऱ्या टप्प्याचे अनुदान देण्यास होते टाळाटाळ' या आशयाचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

आयुक्त अजय लहाने यांनी याबाबत सतत पाठपुरावा केल्याने आता नागरिकांनीही वैयक्तिक स्वच्छतागृहासाठी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाने अनेक नागरिकांना पहिल्या टप्प्यातील अनुदान वळते केले. त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले. पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाल्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले असेल त्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान देण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. परंतु, अनेक लाभार्थ्यांनी संबंधितांकडे दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची मागणी केल्यानंतर त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न काही कर्मचारी करत असल्याच्या तक्रारी पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. प्रशासनाने दखल घेत, अभियानाच्या यशस्वितेसाठी तसेच ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील अनुदानातून स्वच्छतागृहाचे काम सुरू केले आहे. त्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वळते करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती केली आहे. या दोन कर्मचाऱ्यांची टीम सोमवारपासून ज्या लाभार्थ्यांनी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले आहे, त्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वळते करण्याचे काम सुरू करणार आहेत.

अडवणूक होतेय, मग नावे कळवा
^स्वच्छतागृहाच्यादुसऱ्याटप्प्यातील अनुदानासाठी कर्मचारी अथवा त्रयस्थ व्यक्ती अडवणूक करीत असेल, टाळाटाळ करीत असेल अथवा पैशाची मागणी करीत असेल, त्यांची नावे लाभार्थ्यांनी त्वरित कळवावी. असे कर्मचारी अथवा व्यक्तींवर कारवाई केली जाईल.
- अजय गुजर, कार्यकारीअभियंता, महापालिका