आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्वच्छ विद्यालय’चे निकष निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - स्वच्छ विद्यालय-स्वच्छ महाराष्ट्र ही माेहीम कार्यान्वित करण्यात अाली असून, स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शालेय शिक्षण क्रीडा विभागाने क्षेत्रे (निकष) निश्चित केले अाहेत. याबाबतचे अादेश शुक्रवारी जारी केले असून, यासाठी जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड करण्यात येणार अाहे. या अादेशाची प्रत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवण्यात अाली अाहे.
विद्यार्थ्यांना अाराेग्य संपन्न जीनव जगता यावे, त्यांची सर्व राेगांपासून मुक्तता व्हावी, यासाठी ‘स्वच्छ विद्यालय-स्वच्छ महाराष्ट्र’, ही माेहीम राबवण्यात अाली. त्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाने देशातील शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. नामनिर्देशन करताना शाळांसाठी प्रश्नावली तयार केली. शिक्षण विभागाने पुरस्कारासाठीच्या सूचना, क्षेत्रे इतर बाबी स्पष्ट केल्या अाहेत.

अशा राहतील समित्या : स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी तालुका, जिल्हा राज्यस्तरीय समिती गठित करण्यात येणार अाहे. तालुकास्तरीय समिती गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित राहील. समितीमध्ये विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करता येणार अाहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार असून, समितीमध्ये शिक्षणाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा अाराेग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश राहील. राज्यस्तरीय समिती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणार अाहे. या समितीमध्ये शिक्षण संचालक, अाराेग्य संचालक, नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी राहणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...