आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - जनतेच्या आशीर्वादाने केंद्रात राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. गत दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाेर गरिब जनतेच्या हितासाठी मोठ्या संख्येने योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणामसुद्धा दिसून येत आहे. आता अकोट नगर परिषदेतसुद्धा भाजपला सत्ता द्या, शहराचं चित्र बदलवू. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या अध्यक्ष पदासह सदस्य पदांच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी स्थानिक नेहरू पार्क येथे २५ नोव्हेंबर रोजी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश भारसाकळे होते. व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हरिनारायण माकोडे, अॅड. बाळासाहेब आसरकर, श्रीराम नाठे, राजेश नागमते, पुरुषोत्तम चौखंडे, कनक कोटक, संतोष झुनझुनवाला, शहराध्यक्ष योगेश नाठे, तालुकाध्यक्ष राजेश रावणकार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार संजय धोत्रे यांनी अकोट शहर मोठी व्यापारपेठ असून, मूलभूत सोयी सुविधांपासून दूर आहे. त्या पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी भाजपला नगर परिषदेची सत्ता द्यावी, असे आवाहन केले. प्रास्ताविकाद्वारे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शहरातील समस्यांचा पाढा वाचला. शहर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

याप्रसंगी विकासाच्या वाटेवर दोन पावले या घडीपुस्तीकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भव्य पुष्पहाराने मुख्यमंत्र्यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. सभेला मोठ्या संख्येने नागरिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संतोष राठौर यांनी केले.

राज्यात जनतेला काेटी गॅस जाेडणी देऊ
राज्यातील जनतेच्या उत्कर्षासाठी शासन विविध याेजना राबवित अाहे. राज्यातील गरीब कुटुंबांना काेटी गॅस जाेडण्या देण्यात अाल्या अाहेत. अाता लवकरच काेटी गॅस जाेडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

तेल्हाऱ्याच्या विकासासाठी निधी देऊ
तेल्हाऱ्याच्या विकासासाठी निधी कमी पडून देेणार नाही, असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अाता राज्य शासन शहरांच्या विकासाकडे लक्ष देणार असून, तेल्हारा बायपासचाप्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

१०० शहरे हागणदारीमुक्त केल्याचा दावा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरांचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने गावे ओस पडली. त्यामुळे शहरातील जीवनमान खालावले. यातून उद््भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करत मोदी सरकार स्मार्ट सिटी अमृत अशा योजनांच्या माध्यमातून शहरांचा विकास साधत आहेत. शहरातील नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा मिळाल्या पाहिजेत. कारण, ६५ टक्के उत्पन्न शहरामध्ये तयार होते. तेच उत्पन्न शहरातील सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी वापरले गेले पाहीजे. गेल्या ५० वर्षांत राज्यातील एकही शहर हागणदारीमुक्त झाले नाही. मात्र, गत दोन वर्षांत ३०० पैकी १०० शहरे हागणदारीमुक्त केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
भाजपचा काळा पैसा पांढरा : अशोक चव्हाण
प्रतिनिधी | अकोट
नोटबंदी आधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. अकोट येथे गवळीपुरा भागातील प्रचारसभेत बोलताना केला. या वेळी खासदार हूसेन दलवाई यांनी नरेंद्र मोदींवर जहरी टिका करत त्यांचा उल्लेख “सैतान’, अदानी-अंबानींचा “दलाल’ असा उल्लेख केला.

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अकोट येथे प्रचारार्थ शहरात आले होते. अकोटातील गवळीपुरा भागात झालेल्या या प्रचारसभेत अशोक चव्हाणांनी मोदींवर जोरदार टिका केली. नोटबंदी आधी भाजपनं आपला काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप या वेळी चव्हाण यांनी केला. सहा महिन्यांआधी नोटबंदीची बातमी येतेच कशी?, असा सवाल चव्हाण यांनी केला. व्यासपीठावर वजाहत मिर्झा, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, अझहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी मंत्री रामदास बोडखे, बाबाराव विखे पाटील, महेंद्रसिंग सलुजा, बबनराव चौधरी, ब्रिजमोहन गांधी, रफीक पटेल, मो. बद्रुजमा, राजीव बोचे, साजीद पठाण, सुभाष कोरपे, डाॅ. सुधीर ढोणे, महेश गणगणे, दादाराव मते, प्रमोद लहाने, कैलास गोंडचर, हेमंत देशमुख, प्रा. संजय बोडखे, रितेश अग्रवाल, अविनाश देशमुख, कदीर ठेकेदार, उषा विरक, पुष्पा गुलवाडे, विभा राऊत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आठवले यांनी केले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामचंद्र बरेठीया यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. आभार बाबाराव विखे पाटील यांनी मानले.
नोटबंदीच्या निर्णयामागे उभे राहा: मुख्यमंत्री
प्रतिनिधी | अकोट
पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या नोटबंदी निर्णयाच्या पाठीमागे जनतेनं खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यासाठी जनतेनं फक्त ५० दिवस त्रास सहन करून त्याग करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. ते अकोट येथे नेहरू पार्क भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते.
पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या एका बाणानं तीन शिकारी केल्याचं ते म्हणालेत. नोटबंदीमुळे आतंकवादी-नक्षलवाद्यांचंं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलंय. याशिवाय पाकिस्तान काळ्या पैशावाल्यांना मोदींच्या निर्णयानं कंगाल केल्याचं म्हटलं. त्यामुळे फक्त ५० दिवस त्रास सहन करून नंतर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, 2019 पर्यंत राज्यातील प्रत्येक गरीबाला सरकार साडेचार लाखांचं घर देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. नगर परिषदेत भाजप सत्तेत आल्यास गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच शहरातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी आपल्या भाषणात केंद्र राज्य सरकारद्वारे कार्यान्वित विविध लोकोपयोगी, जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. भ्रष्टाचार काळापैसा देशाच्या विकासात प्रमुख अडथळा असून, सगळ्यात मोठा कॅन्सर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केेले. यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात अंतिम निर्णायक लढाईला सुरुवात केली आहे. या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईत जनतेने सहभागी होत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...