आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्याधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचा अादेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- अकाेला,बाेरगाव मंजू येथे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साेमवारी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हािधकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

रेन वाॅटर हार्वेस्टींगसाठी तयार केलेल्या शाेषखड्यातील पाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करूण अंत झाल्याची घटना अादर्श काॅलनीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६मधील मैदानात घडली हाेती. या दुर्घेटेनेत सिद्धार्थ राजेश धनगावकर कृष्णा राकेश बहेल हे मृत्युमुखी पडले हाेते. बोरगाव मंजू येथील श्याम संजय सोळंके अनिल अरुण लांधे यांचा बंधाऱ्यात पडून मृत्यू झाला हाेता. ही घटना अाॅगस्ट राेजी घडली हाेती. तसेच रमेश बळीराम करंगळे (वय ३८, रा. मोठी उमरी) याचा १५ ऑगस्ट १६ रोजी यांचे सूर्य धबधबा खटकाली धारगड बंधाऱ्यात पडून अपघाती निधन झाले. तसेच कपिल समाधान दांडगे (रा. एद्लापूर ता. अकोट) यांचा पुणे रेल्वे स्टेशन रेल्वेरूळ ओलांडतांना १५ जुलै राेजी मृत्यू झाला हाेता. या सर्वांना मुख्यमंत्री सह्य्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी अामदारांनी केली हाेती.

अकाेला येथील बहाल धनगावकर परिवाराला रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे प्रत्येकी २५ हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. जिल्ह प्रशासनातर्फे प्रत्येकी २५ हजार आमदारद्वय यांच्या आग्रहावर महानगर पालिका प्रशासनाने ५० हजार रुपयाची आर्थिक मदत दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...