आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएम’ना करायचे अकाेला डेव्हलप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकाच वेळी सहा कार्यक्रमांना उपस्थित राहायचे होते. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील चार कोटी ४५ लाख रुपये खर्चून उभारलेले जिल्हा नियोजन समितीचे सभागृहाचे लोकार्पण दहा कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचाही समावेश होता. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री आले, त्यांनी फीत कापली अन् निघून गेले. या दोन मिनिटांच्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने सलग २० तास मेहनत घेतली. तसेच रस्ता बंद केल्याने नागरिकही वेठीस धरले गेले. त्यामुळे सर्व कार्यक्रम एकाच ठिकाणी घेण्यामागचे नेमके कारण काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.
बुधवारपासूनच अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गात पॅचिंग, झेब्रा क्रॉसिंग आदी कामे करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक बंद केली. परंतु, मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले, त्यांनी कुदळ मारली, फीत कापली आणि निघून गेले. हा कार्यक्रम दोन मिनिटात संपला. परंतु, त्यासाठी २० तास खर्ची झाले आणि नागरिकही वेठीस धरल्या गेले.
प्रथमनागरिकाचा पडला विसर : अकोलाक्रिकेट क्लब मैदानावरील कार्यक्रमात लोकप्रतिनिधींपेक्षा अधिकाऱ्यांचेच वर्चस्व दिसले. व्यासपीठावर अधिकारी स्थानापन्न झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील एका आमदाराला बसण्यास जागाही नव्हती. कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनीच अधिकाऱ्यांचे गुणगान केले. मात्र, शहराच्या प्रथम नागरिक महापौर उज्ज्वला देशमुख आणि कार्यक्रमस्थळी उशिरा आलेले जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वागत करण्याचे भानही राहिले नाही.
नागरिकांनाशासनाच्या विभागांची माहिती व्हावी, या उद्देशाने सभास्थळी महाराजस्व अभियानांतर्गत विविध योजनांचे ३७ स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनाच्या स्टॉल्सचा सहभाग होता. त्यामध्ये मिशन दिलासा, जलयुक्त शिवार, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वन विभाग, मत्स्य व्यवसाय, अन्न औषध प्रशासन विभाग महिला बालकल्याण आदी विभागांचा समावेश होता. या उपक्रमासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राजेश्वर हांडे, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, पूजा माटोडे आदी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मुख्यमंत्र्यांनादिली ७८ निवेदने : मुख्यमंत्र्यांनानिवेदने देण्यासाठी उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी स्टॉल उभारला होता. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली नाहीत, तर संबंधितांनी या ठिकाणी निवेदने दिली. या वेळी ७८ निवेदने देण्यात आली. तिथे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, कनिष्ठ लिपिक विशाल ठाकरगे शिरीष बोरसे उपस्थित होते.
‘स्वच्छभारत, स्वस्थ भारत’ या विषयावर विभागीयस्तरावर आयोजित निबंध स्पर्धेतील २५ विजयी स्पर्धकांना गुरुवारी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात केवळ पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. बक्षीस स्वीकारण्यासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र ताटकळत बसावे लागले. त्यामुळे कर्यक्रमापूर्वी आनंदात असलेले हे विद्यार्थी नाराज झाले. विशेष म्हणजे निमंत्रण देऊन बोलावलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या पालकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही प्रशासनाने केली नाही. या प्रकारामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.

संपूर्ण राज्यात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विशेषत: विद्यार्थ्यांमध्येच जागरूकता निर्माण होऊन त्यांच्याकडून अस्वच्छता निर्मूलनासाठी योग्य सूचना, कल्पना मिळाव्यात, या अनुषंगाने विभागीयस्तरावर ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ या विषयावर २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अमरावती विभागातून २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील विजयी २५ विद्यार्थ्यांना अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार होते. त्या अनुषंगाने कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांना विद्यार्थ्यांसह उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार असल्याने अमरावती विभागातील २५ विजयी स्पर्धक आपल्या शिक्षक आणि पालकांसह कार्यक्रमस्थळी सकाळी दहा वाजताच दाखल झाले. या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमस्थळी बसण्याची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या व्यवस्थेमुळे २५ पैकी पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. त्यामुळे उर्वरित २० विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक मात्र नाराज झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या मुलाला बक्षीस मिळणार म्हणून काही पालक गणगोतासह कार्यक्रमस्थळी हजर झाले होते. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी उपस्थित झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही प्रशासनाने केली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तहानेने व्याकूळ व्हावे लागले. या प्रकाराबाबत उपस्थित पालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री गेल्यानंतर झाले बक्षीस वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळावरून निघून गेले. त्यानंतर उर्वरित २० विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी थांबण्याचे आवाहन करण्यात आले. यादरम्यान उपस्थित नागरिकही कार्यक्रमस्थळावरून जात होते.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

महा-राजस्वकडे केले दुर्लक्ष
जिल्हाप्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महा-राजस्व अभियानात िवविध प्रकारचे ३७ स्टॉल लावले होते. या स्टॉलला नागरिकांनी भेटी दिल्या, माहितीसह तपासण्याही केल्या. परंतु, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या स्टॉलकडे दुर्लक्ष केले.
"नियोजन' सभागृहाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री.